ट्रॅजेडी किंग नको, नेता मोदींसारखा हवा, कुमारस्वामी यांना अरुण जेटलींचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 03:23 AM2018-07-17T03:23:04+5:302018-07-17T03:23:18+5:30

कर्नाटकमधील काँग्रेस व जनता दल (एस)च्या संधीसाधू आघाडी सरकारला देशसेवा करण्यात रस नसून त्यांना फक्त स्वत:चे अस्तित्व टिकवायचे आहे, अशी कडक टीका केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी केली.

 Tragedy King, not like leader Modi, Kumaraswamy to Arun Jaitley | ट्रॅजेडी किंग नको, नेता मोदींसारखा हवा, कुमारस्वामी यांना अरुण जेटलींचा टोला

ट्रॅजेडी किंग नको, नेता मोदींसारखा हवा, कुमारस्वामी यांना अरुण जेटलींचा टोला

Next

नवी दिल्ली : कर्नाटकमधील काँग्रेस व जनता दल (एस)च्या संधीसाधू आघाडी सरकारला देशसेवा करण्यात रस नसून त्यांना फक्त स्वत:चे अस्तित्व टिकवायचे आहे, अशी कडक टीका केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी केली.
विष पचवत आघाडी सरकार चालवत आहे असे कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी रविवारी सांगितले तेव्हा त्यांचा कंठ दाटून आला व डोळ््यात अश्रू तरळले होते. त्या अनुषंगाने जेटलींनी म्हटले की, देशाला नरेंद्र मोदींसारख्या निश्चयी नेत्याची आवश्यकता आहे, कुमारस्वामी यांच्यासारख्या ट्रॅजिडी किंगची नव्हे! जेटली यांनी फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, कुमारस्वामींबरोबर जसे काँग्रेस वागत आहे, अगदी तशीच स्थिती त्यांनी चौधरी चरणसिंग, चंद्रशेखर, एच. डी. देवेगौडा, आय. के. गुजराल यांचीही केली होती. मोदी व त्यांच्या पक्षाला सत्तेपासून लांब ठेवण्याच्या संकुचित हेतूपायीच काँग्रेस व जनता दल (एस)ने संधीसाधू युती केली.
जगात सर्वात वेगाने विकास पावणारी अर्थव्यवस्था असलेल्या देशाचा प्रमुख नेता ‘बिचारा' असून चालणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. जेटली यांनी म्हटले आहे की, समजा भारताचे पंतप्रधान असे कॅमेरासमोर अश्रू गाळू लागले, आपल्याला होणाऱ्या त्रासातून सुटका करुन घेण्याची भाषा करु लागले तर यूपीए सरकारच्या दुसºया कारकिर्दीत झालेल्या धोरण-लकव्यापेक्षा ही स्थिती गंभीर असेल.
>सेक्युलॅरिझममुळेच जेडीएसला पाठिंबा : खर्गे
सेक्युलॅरिझमवर काँग्रेस व जेडीएसचा विश्वास असल्यानेच या दोन पक्षांचे आघाडी सरकार स्थापन होऊ शकले. या गोष्टीकडे कुमारस्वामी यांनी विशेष लक्ष दिले पाहिजे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी म्हटले आहे. कोणत्याही समस्येला सामोरे जायचे असते. त्याविषयी जाहीरपणे तक्रार करत बसले तर सेक्युलर पक्षांना पाठिंबा देणाºया लोकांपर्यंत चुकीचा संदेश जाऊ शकतो. कोणत्याही परिस्थितीचा कुमारस्वामींनी निडरपणे सामना करायला हवा, असेही ते म्हणाले.

Web Title:  Tragedy King, not like leader Modi, Kumaraswamy to Arun Jaitley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.