मोबाईल नंबर राहणार दहाच आकडी; 'ट्राय'च्या खुलाश्यामुळे चिंताच मिटली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 04:06 PM2020-05-31T16:06:15+5:302020-05-31T16:38:03+5:30
मोबाईल नंबर ११ आकडी करण्याचा विचार नाही; TRAIचा महत्त्वपूर्ण खुलासा
नवी दिल्ली: देशातील मोबाईल नंबर ११ आकडी करण्याचा कोणताही विचार नसल्याचं भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणानं (ट्राय) स्पष्ट केलं आहे. लँडलाईन आणि मोबाईल सेवेच्या क्रमांकांबद्दल पुरेशी संसाधनं निश्चित करण्याबद्दलच्या शिफारसी ट्रायनं शुक्रवारी सुचवल्या होत्या. त्यानंतर मोबाईल क्रमांक ११ आकडी होणार असल्याचं वृत्त समोर आलं. त्याबद्दल ट्रायनं आज महत्त्वाचा खुलासा केला. देशातील मोबाईल क्रमांक १० आकडीच राहतील, असं ट्रायनं स्पष्ट केलं आहे.
Some media houses have reported that TRAI has recommended 11-digit numbering plan for mobile services. As per TRAI recommendation,country will continue with 10-digit numbering,we've categorically rejected shifting to 11-digit numbering plan:Telecom Regulatory Authority of India pic.twitter.com/1YQR1ndzh1
— ANI (@ANI) May 31, 2020
लँडलाईन आणि मोबाईल सेवेच्या क्रमांकांबद्दल पुरेशी संसाधनं निश्चित करण्याबद्दलच्या शिफारसींवर ट्रायनं शुक्रवारी भाष्य केलं होतं. 'त्या शिफारशींचा चुकीचा अर्थ काढला गेला. मोबाईल क्रमांक ११ आकडी करण्याची शिफारस ट्रायनं केलेली नव्हती,' असं ट्रायनं आज स्पष्ट केलं. याबद्दल ट्रायनं एक प्रसिद्धीपत्रकच जारी केलं आहे. 'देशातील मोबाईल क्रमांक दहाच आकडी राहतील. ते ११ आकडी करण्याचा विचार आम्ही आधीच पूर्णपणे फेटाळून लावला होता,' असं ट्रायनं म्हटलं आहे.
एखाद्या फिक्स लाईन नंबरवरून मोबाईलवर कॉल करताना त्याआधी शून्य क्रमांक डायल करण्याची शिफारस आम्ही केली होती, असं ट्रायनं म्हटलं. एखादा नंबर डायल करण्याआधी शून्य क्रमांक डायल करावं लागणं म्हणजे तो क्रमांक ११ आकडी होणं, असा अजिबात होत नाही, असं ट्रायनं आज केलेल्या खुलाशात म्हटलं आहे. हा केवळ डायलिंग पद्धतीमधला बदल असल्याचं ट्रायनं स्पष्ट केलं.
एका फिक्स्ड लाईन नंबरवरून दुसऱ्या फिक्स्ड लाईन नंबरवर इंटर-शॉर्ट डिस्टन्स चार्जिंग एरिया (एसडीसीए) कॉल करताना त्याआधी शून्य डायल करावाचा लागतो. आताही हीच पद्धत सुरू आहे, याकडे ट्रायनं लक्ष वेधलं. एखाद्या फिक्स्ड लाईन नंबरला मोबाईल नंबरवरून कॉल केल्यासही त्याआधी शून्य डायल करावा लागतो. सध्या सुरू असलेल्या याच पद्धतीत अतिशय लहानशी भर घालण्याची शिफारस करण्यात आली आहे, असं ट्रायनं म्हटलं आहे.
नेपाळची पुन्हा आगळीक, नव्या नकाशात भारताचे तीन भाग दाखवले आपल्या हद्दीत
पेट्रोलचे दर, गॅस सिलिंडर, रेशनकार्ड अन् रेल्वेसह उद्यापासून सहा नियम बदलणार, जाणून घ्या...
उद्धव ठाकरेंचा अनुभव कमी पडतोय का?; अमित शहा म्हणतात...