दोन विभागांच्या भांडणात अडकले ट्रेलर (१)

By admin | Published: July 8, 2015 11:45 PM2015-07-08T23:45:15+5:302015-07-08T23:45:15+5:30

- गेंट्रीच्या उंचीच्या नियमांचा पत्ता नाही : मंत्रालयाच्या परवानगीपर्यंत ट्रेलर रेंगाळणार

Trailer stuck in two divisions (1) | दोन विभागांच्या भांडणात अडकले ट्रेलर (१)

दोन विभागांच्या भांडणात अडकले ट्रेलर (१)

Next
-
ेंट्रीच्या उंचीच्या नियमांचा पत्ता नाही : मंत्रालयाच्या परवानगीपर्यंत ट्रेलर रेंगाळणार
नागपूर : चिंचभुवनजवळ दोन अवजड लोखंडाचे सामान असलेले ट्रेलर गेल्या आठ दिवसांपासून अडकून पडले आहे. यामुळे होणाऱ्या अपघाताची वाहतूकदाराला कुठलीही पर्वा नाही. यासंदर्भात संबंधित विभागही समस्येचे निराकरण करण्यात अपयशी ठरले आहे. या विभागांना नियमांची माहितीच नाही. हे ट्रेलर जेथे फसले आहेत त्याची जबाबदारी एनएचआय आणि बीडब्ल्यूडी एकमेकांवर ढकलते आहे.
नागपूरच्या वर्धा मार्गावरील चिंचभुवन आरओबी धोकादायक आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला फोरलेन मार्ग आहे पण पूल टू लेन आहे. वर्धा मार्गावर पूल संपतो तेथेच हे ट्रेलर थांबविण्यात आले आहेत. बुधवारी दुपारपर्यंत या ट्रेलरला रेट्रो रिफ्लेक्टीव्ह टेप लावण्यात आलेले नव्हते. रात्री ब्लिंकर (चालू बंद होणारा लाईट) ही सुरू ठेवण्यात येत नाही. यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची चिन्हे आहेत. विशेषत: हे ट्रेलर १ जुलै रोजी काढण्यात आले आणि परवानगी प्राप्त करण्याची प्रक्रिया ३ जुलैला प्रारंभ करण्यात आली. वाहतूकदार म्हणतो गेंट्री (शहराच्या जवळ असणारे साईन बोर्डचे गेट) केवळ १९ फूट उंच आहे. एनएचआयच्या म्हणण्याप्रमाणे गेंट्रीची उंची साडेपाच मीटर तर पीडब्ल्यूडीप्रमाणे ही उंची साडेचार मीटर असायला हवी. वाहतूकदाराचा दावा मात्र २२ फूट अर्थात जवळपास साडेसात मीटर उंची असली पाहिजे, असा आहे.
-------------
गेंट्री साडे चार मीटर उंच असते
नागपूर - वर्धा मार्गावरील जामठापर्यंतचा १४ कि. मी. रस्त्याची देखभाल करण्याची जबाबदारी पीडब्ल्युडीजवळ आहे. गेंट्री साडे चार मीटर उंचीची असते. आमच्या कार्यक्षेत्रात एकच गेंट्री येतो, असे मत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डहाके यांनी व्यक्त केले. वाहतूकदाराने यासंदर्भात पीडब्ल्यूडीशी संपर्क केलेला नाही.

Web Title: Trailer stuck in two divisions (1)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.