ट्रेन बॉम्बस्फोट : दहशतवाद्यांनी 'ते' फोटो पाठवले सीरियात

By admin | Published: March 8, 2017 10:51 AM2017-03-08T10:51:35+5:302017-03-08T11:27:01+5:30

देशात आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटकडून करण्यात आलेल्या पहिल्या हल्ल्यासंदर्भात काही धक्कादायक माहिती समोर येत आहे.

Train bomb blasts: terrorists sent 'to' photos in Syria | ट्रेन बॉम्बस्फोट : दहशतवाद्यांनी 'ते' फोटो पाठवले सीरियात

ट्रेन बॉम्बस्फोट : दहशतवाद्यांनी 'ते' फोटो पाठवले सीरियात

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 8 - देशात आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटकडून करण्यात आलेल्या हल्ल्यासंदर्भात काही धक्कादायक माहिती समोर येत आहेत. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी भोपाळ-उज्जैन प्रवासी रेल्वेत करण्यात आलेला हा बॉम्बस्फोट ही घातपाताची एक झलक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  
 
तर दुसरीकडे, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही दहशतवाद्यांचा इस्लामिक स्टेटसोबत कनेक्शन असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ट्रेनमध्ये पाईप बॉम्ब ठेवल्यानंतर दहशतवाद्यांनी त्याचे फोटो सीरियाला पाठवले, अशी माहितीही त्यांनी दिली. 
(लखनऊ चकमक अखेर संपली, एका दहशतवाद्याचा खात्मा)
 
मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारात भोपाळहून उज्जैनला जाणाऱ्या रेल्वेमध्ये जबडीत स्टेशनजवळ आयईडी बॉम्बचा स्फोट झाला. यात 10 जण जखमी झाले असून, त्यापैकी तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनंतर काही तासांनी पोलिसांनी इटावा येथून एकाला आणि कानपूरहून दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांचे आयएसशी संबंध असल्याचे पोलिसांनी सांगितले.  
 
इसिससोबत संबंध असलेले दहशतवादी देशात मोठा घातपात घडवण्याच्या प्रयत्नात होते. यासाठी त्यासाठी बरीच तयारीदेखील केली होती, अशीही माहिती समोर आली आहे. 
(भारतातही इसिस?)
दरम्यान, शिवराज सिंह चौहान यांनी असेही सांगितले की, 'दहशतवाद्यांचा इसिससोबत संबंध असल्याचा पुरावा देणारे ब-याच वस्तूही हाती लागल्या आहेत. उत्तर प्रदेशातील कानपूर आणि कन्नौज येथे राहिलेले हे दहशतवादी ट्रेनमध्ये स्फोट घडवून आणल्यानंतर लखनऊमध्ये येणार होते.  दहशतवाद्यांकडे मिळालेल्या स्फोटकांवर 'ISIS आम्ही भारतात आहोत', असे लिहिले होते. शिवाय, दहशतवाद्यांनी ट्रेनमध्ये स्फोटकं ठेवल्यानंतर त्याचे फोटो सीरियात पाठवण्यात आले. या सर्व बाबी दहशतवाद्यांचा इसिससोबत संबंध असल्याचा पुरावा आहेत.दहशतवाद्यांनी इंटरनेटद्वारे बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतले. दरम्यान सुदैवाने, दहशतवाद्यांनी स्फोटकं अपर बर्थमध्ये ठेवल्याने मोठे नुकसान झाले नाही. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात पोलिसांनी यश आले',असेही चौहान म्हणाले. 
 
तर लखनऊ येथील ठाकुरगंज परिसरातील हाजी कॉलनी येथील एका घरात मध्य प्रदेशातील स्फोटाशी संबंधित दहशतवाद्यालाही कंठस्नान घालण्यात आले.
 

Web Title: Train bomb blasts: terrorists sent 'to' photos in Syria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.