उत्तर प्रदेशात ट्रेन रुळावरुन घसरली, 8 जखमी
By admin | Published: April 15, 2017 10:14 AM2017-04-15T10:14:26+5:302017-04-15T10:31:54+5:30
मेरठहून लखनऊला जाणारी राज्यराणी एक्स्प्रेसचे (22454) आठ डबे रुळावरुन घसरले आहेत
Next
ऑनलाइन लोकमत
मेरठ, दि. 15 - मेरठहून लखनऊला जाणारी राज्यराणी एक्स्प्रेसचे (22454) आठ डबे रुळावरुन घसरले आहेत. रामपूर येथे ओसरियापूरजवळ ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून 10 प्रवासी जखमी झाले आहेत. दुर्घटेनंतर अडकलेल्या प्रवाशांना तात्काळ बाहेर काढत रुग्णालयात नेण्यात आलं. तर अद्यापही काही लोक अडकले असण्याची भीती व्यक्त होत आहे. घटनेनंतर जवळच्या लोकांनी आणि रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दुर्घटनेमुळे प्रवासी प्रचंड घाबरले असून कोणीही पुढील प्रवास ट्रेनने करण्यास तयार नाही. त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जात आहे.
ट्रेन सकाळी 4 वाजून 55 मिनिटांनी मेरठहून निघाली होती. हापूड, अमरोहा, रामपूर, बरेली, शाहजहापूर, हरदोई असा प्रवास करत 1 वाजून 10 मिनिटांनी ट्रेनला लखनऊ स्टेशन गाठायचं होतं. पण रामपूरच्या आधी ट्रेनला काही धक्के बसले आणि रुळावरुन घसरली. हे सर्व काही कळायच्या आत अचानक झालं असं प्रवाशांनी सांगितलं आहे. कोणी काही करायच्या आत ट्रेनचे डबे पलटले होते. दुर्घटनेनंतर जवळच्या लोकांनी धाव घेतली आणि अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढत रुग्णालयात नेलं.
केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहे. काही दोष आढळल्यास कारवाई करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली आहे. तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जखमींना 25 हजार तर गंभीर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली आहे.
#Visuals from Uttar Pradesh: Eight coaches of Meerut-Lucknow Rajya Rani Express derail near Rampur. pic.twitter.com/Lljzs16Cdq
— ANI UP (@ANINewsUP) April 15, 2017