ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान पुन्हा कुटुंबाला मारहाण

By admin | Published: July 14, 2017 12:22 PM2017-07-14T12:22:50+5:302017-07-14T12:22:50+5:30

उत्तर प्रदेशातील मैनपूरीजवळ शिकोहाबाद-कासगंज पॅसेंजरमध्ये एका कुटुंबावर जमावाकडून हल्ला करण्यात आला.

On the train, the family assaulted again | ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान पुन्हा कुटुंबाला मारहाण

ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान पुन्हा कुटुंबाला मारहाण

Next

ऑनलाइन लोकमत

आग्रा, दि. 14- ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान जुनैद या तरूणावर हल्ल्ला झाल्याची घटना ताजी असताना पुन्हा एकदा कुटुंबावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील मैनपूरीजवळ शिकोहाबाद-कासगंज पॅसेंजरमध्ये एका कुटुंबावर जमावाकडून हल्ला करण्यात आला. बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली आहे. कुटुंबातील ज्येष्ठ नागरीक, महिला आणि अपंग व्यक्तिला या जमावाने मारहाण केली आहे. फक्त अंगावरील कपडे वेगळे असल्याने या कुटुंबाला जमावाकडून लक्ष करण्यात आलं होतं. या कुटुंबातील सर्व जखमींना फारूखाबादच्या राम मनोहर लोहिया हॉस्पिटमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.   टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली असून त्यांच्याकडे या घटनेचा व्हिडिओसुद्धा आहे.
आणखी वाचा
 

पुण्यात सिम्बॉयसिस महाविद्यालयातील विद्यार्थ्याची आत्महत्या

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर झाड कोसळल्यानं वाहतुकीवर परिणाम

उत्तर प्रदेश विधानसभेत स्फोटकं आढळल्याने खळबळ

आमच्या अंगातील कपडे वेगळे दिसत होते. कपड्यामुळे आमची ओळखही त्यांच्या पेक्षा वेगळी दिसत होती. त्यामुळेच जमावाने आमच्यावर हल्ला केल्याचं कुटुंबातील एका जखमी व्यक्तिने सांगितलं आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. "भोगावजवळ आम्ही ट्रेनमध्ये चढलो होतो. गाडी ४ किलो मीटरपर्यंत पण पोहचली नव्हती तेव्हा एका व्यक्तिने माझा मुलगा फैजानकडून मोबाइल हिसकावून घेतला. त्याला फैजानने विरोध केला त्यावेळी जमावाने त्याला मारहाण सुरू केली. तसंच कुटुंबातील महिलांना शिवीगाळ सुरू केली. या मारहाणीत आमच्या कुटुंबातील ४ सदस्य गंभीर जखमी झाले असून त्यांना फ्रॅक्चर झालं आहे तसंच त्यांच्या डोक्याला आणि पोटाला मार लागला आहे", असं ५० वर्षीय मोहम्मद शाकिर यांनी सांगितलं आहे. जमावाला आमच्या दिशेने येताना पाहून आम्ही ट्रेन कंपार्टमेंटचा दरवाजा लॉक करण्याता प्रयत्न केला पण तोपर्यंत काही लोक आतमध्ये आली होती. त्या जमावाने आम्ही बेशुद्ध होइपर्यत आम्हाला मारहाण केल्याचंही कुटुंबातील एका व्यक्तीने सांगितलं आहे. 

 
दरम्यान, या कुटुंबातील महिलांच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आहेत तसंच त्यांचे कपडेही फाटले होते, असं पोलिसांनी सांगितलं आहे. याप्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला असून आरोपींना लवकरात लवकर पकडण्यात येइल, असंही पोलीस म्हणाले आहेत. 
 

Web Title: On the train, the family assaulted again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.