एक कोटी तरुणांना प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 12:57 AM2017-08-10T00:57:07+5:302017-08-10T00:57:11+5:30
भारत ही जगाची कौशल्य विकासाची राजधानी बनावी, ही साºया देशाची महत्त्वाकांक्षा असल्याचे प्रतिपादन केंद्रीय कौशल्य विकासमंत्री राजीव प्रताप रुडी यांनी केले.
सुरेश भटेवरा
नवी दिल्ली : भारत ही जगाची कौशल्य विकासाची राजधानी बनावी, ही साºया देशाची महत्त्वाकांक्षा असल्याचे प्रतिपादन केंद्रीय कौशल्य विकासमंत्री राजीव प्रताप रुडी यांनी केले.
कुशल भारत अभियानाचा प्रारंभ १५ जुलै २0१५ रोजी झाला. स्किल इंडिया मिशनच्या दुसºया वर्षपूर्तीच्या निमित्ताने वार्तालापात ते म्हणाले की, कौशल्य विकासाच्या स्किल इंडिया मिशनचा विषय निघताच लोक पहिला प्रश्न विचारतात की, गेल्या दोन वर्षांत किती लोकांना या मंत्रालयाने रोजगार मिळवून दिले? याबाबत ते म्हणाले, रोजगार मिळवून देणे हे स्किल इंडिया मंत्रालयाचे काम नाही. रोजगारांसाठी आवश्यक कौशल्याचे प्रशिक्षण देऊन तरुणांच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी हे मिशन आहे. दोन वर्षांत देशातल्या एक कोटी तरुणांना विविध कौशल्यांमध्ये प्रशिक्षित करण्याचे काम सुरू आहे.
कारखान्यांना योजनेशी संलग्न करून घेणार
कौशल्य विकास मंत्रालयाचे सचिव के. पी. कृष्णन म्हणाले की, देशात २0२२पर्यंत २४ क्षेत्रांना उत्तम कौशल्य व गुणवत्ता मिळवलेल्या किमान १0 कोटी मनुष्यबळाची गरज लागणार आहे. ही मागणी पूर्ण करण्याचे आव्हान मोठे आहे.
प्रतिवर्षी विविध क्षेत्रांतील कौशल्यात एक कोटी तरुणांना प्रशिक्षित करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. स्किल इंडिया मिशनचा प्रारंभ होऊ न दोन वर्षे झाली आहेत. देशातील कारखान्यांना प्रशिक्षण योजनेशी संलग्न करून काही अल्पकालीन अभ्यासक्रम चालवण्याचाही इरादा आहे.