तीन विभागांमध्ये ४६ कर्मचार्‍यांच्या बदल्या जि.प.त कार्यवाही : आज ग्रा.पं, पशुसंवर्धन, सा.प्र.च्या बदल्या

By admin | Published: May 11, 2016 10:14 PM2016-05-11T22:14:46+5:302016-05-11T22:14:46+5:30

जळगाव : जिल्हा परिषदेमध्ये वर्ग तीन व चार मधील कर्मचार्‍यांच्या प्रशासकीय व इतर जिल्हा बदल्यांची कार्यवाही सुरू असून, बुधवारी आरोग्य, पाणीपुरवठा आणि सिंचन विभागातील एकूण ४७ कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या.

Transfer of 46 employees in three departments in ZP: Transfer of Gram Panchayat, Animal Husbandry, Sapr | तीन विभागांमध्ये ४६ कर्मचार्‍यांच्या बदल्या जि.प.त कार्यवाही : आज ग्रा.पं, पशुसंवर्धन, सा.प्र.च्या बदल्या

तीन विभागांमध्ये ४६ कर्मचार्‍यांच्या बदल्या जि.प.त कार्यवाही : आज ग्रा.पं, पशुसंवर्धन, सा.प्र.च्या बदल्या

Next
गाव : जिल्हा परिषदेमध्ये वर्ग तीन व चार मधील कर्मचार्‍यांच्या प्रशासकीय व इतर जिल्हा बदल्यांची कार्यवाही सुरू असून, बुधवारी आरोग्य, पाणीपुरवठा आणि सिंचन विभागातील एकूण ४७ कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या.
सकाळी १० वाजता याबाबत छत्रपती शाहू महाराज सभागृहामध्ये कार्यवाही झाली. सीईओ अस्तिककुमार पांडेय, अतिरिक्त सीईओ संजय मस्कर व संबंधित विभागांचे प्रमुख या वेळी उपस्थित होते.
पडद्यावर रिक्त जागांची व इतर माहिती दाखविण्यात आली. त्यानंतर कार्यवाही करण्यात आली. विविध विभागांमध्ये झालेल्या बदल्यांची माहिती : आरोग्य विभाग- आरोग्यसेविका ११५ (विनंती), २ (आपसी), आरोग्य सहायक (स्त्री) ३ (विनंती), औषध निर्माण अधिकारी ४ (विनंंती), आरोग्य सहायक १ (प्रशासकीय), १ (विनंती), आरोग्यसेवक १ (प्रशासकीय), १२ (विनंती), २ (आपसी). सिंचन विभाग- शाखा अभियंता १ (प्रशासकीय), २ (विनंती). पाणीपुरवठा- शाखा अभियंता १ (प्रशासकीय), १ (विनंती).
१२ रोजी ग्रामपंचायत, पशुसंवर्धन आणि सामान्य प्रशासन विभागातील कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्या जातील. सकाळी १० वाजेपासून त्याबाबत कार्यवाही सुरू केली जाणार आहे.

शिक्षक संघटनांनी घेतली अध्यक्षांची भेट
पेसा व समतोलच्या बदल्यांची कार्यवाही पदोन्नती केल्यानंतर केली जावी तसेच विनंती बदलीने पेसा व समतोलच्या रिक्त जागांवर नियुक्त्या कराव्यात आदी मागण्यांसाठी बुधवारी सायंकाळी शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी जि.प.अध्यक्ष प्रयाग कोळी यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. शिक्षक संघ, शिक्षक सेना, केंद्रप्रमुख संघटना, पदवीधर शिक्षक संघटना, कास्ट्राईब कर्मचारी संघ आदी संघटनांच्या प्रतिनिधींनी अध्यक्ष यांच्याशी बदली प्रक्रियेबाबतच्या आपल्या आक्षेपांची माहिती दिली.

Web Title: Transfer of 46 employees in three departments in ZP: Transfer of Gram Panchayat, Animal Husbandry, Sapr

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.