उत्तर प्रदेशात 41 सनदी अधिका-यांच्या बदल्या
By admin | Published: April 18, 2017 06:56 PM2017-04-18T18:56:49+5:302017-04-18T18:56:49+5:30
उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने 41 सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. राज्यातील सनदी अधिका-यांच्या बदल्या करण्याची
Next
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 18 - उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने 41 सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. राज्यातील सनदी अधिका-यांच्या बदल्या करण्याची ही दुसरी वेळ असून याआधी गेल्या आठवड्यात 20 वरिष्ठ सनदी अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.
नवीन बदल्यांमध्ये डॉ. प्रभात कुमार यांच्याकडे ग्रेटर नोएडा आणि यमुना प्राधिकरणच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. इलाहाबादचे आयुक्त राजन शुक्ला यांची नागरिक सुरक्षा आणि राजकीय संघटना पेन्शन विभागात नेमणूक केली आहे. तर, डॉ. आशिष कुमार गोयल यांच्याकडे इलाहाबाद आयुक्तपदाची जबाबदारी दिली आहे.
आग्राचे आयुक्त चंद्रकांत यांची राज्य मानवाधिकार आयोगाचे सचिव म्हणून नेमणूक केली आहे. झाशीचे आयुक्त राममोहन राव यांची आग्राच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, झाशीच्या आयुक्तपदी अमित गुप्ता यांची नेमणूक करण्यात आली.
दरम्यान, उत्तर प्रदेशातील मागील अखिलेश यादव यांच्या सरकारमध्ये चर्चित असलेले आयएएस अधिकारी नवनीत सेहगल यांच्याकडे अद्याप कोणताही पदभार दिला नाही.