‘अम्फॉन’चे सुपर चक्रीवादळात रूपांतर; पश्चिम बंगाल, ओडिशाला प्रचंड तडाखा बसण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 05:13 AM2020-05-19T05:13:18+5:302020-05-19T05:13:56+5:30

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अम्फान चक्रीवादळाचे रुपांतर सोमवारी दुपारी सुपर चक्रीवादळात झाले आहे़ यावेळी त्याचा जोर कमी होऊन तीव्र चक्रीवादळात रुपांतर झालेले असेल.

The transformation of ‘Amphone’ into a super cyclone; West Bengal, Odisha are likely to be hit hard | ‘अम्फॉन’चे सुपर चक्रीवादळात रूपांतर; पश्चिम बंगाल, ओडिशाला प्रचंड तडाखा बसण्याची शक्यता

‘अम्फॉन’चे सुपर चक्रीवादळात रूपांतर; पश्चिम बंगाल, ओडिशाला प्रचंड तडाखा बसण्याची शक्यता

Next

पुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अम्फान चक्रीवादळाचे आता सुपर चक्रीवादळात रुपांतर झाले आहे़ त्यातील वाऱ्याचा वेग ताशी २३० किमीपर्यंत वाढला आहे़ दरम्यान, मान्सूनची वाटचाल सुरु असून सोमवारी मान्सूनने निकोबार बेटे व्यापली आहेत़
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अम्फान चक्रीवादळाचे रुपांतर सोमवारी दुपारी सुपर चक्रीवादळात झाले आहे़ यावेळी त्याचा जोर कमी होऊन तीव्र चक्रीवादळात रुपांतर झालेले असेल़ यावेळी किनारपट्टीवर ताशी ८० ते ९० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे़ दरम्यान, पुढील दोन दिवस विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे़ गेल्या २४ तासात पुणे आणि परभणी येथे पूर्व मोसमी पाऊस झाला. कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे़

07 किमी (ताशी) वेगाने हे चक्रीवादळ किनारपट्टीच्या दिशेने उत्तरेला पुढे येत आहे़ सोमवारी दुपारी ते ओडिशातील पॅरादीपपासून ७३० किमी दूर होते़ पश्चिम बंगालच्या दिघा पासून ८९० किमी दूर होते़ हे चक्रीवादळ पश्चिम बंगालमधील दिघा आणि बांगला देशातील हटिया दरम्यान २० मे रोजी सायंकाळी धडकण्याची शक्यता आहे़

या चक्रीवादळामुळे ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्कीमपर्यंत जोरदार पावसाची शक्यता असून मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे़

Web Title: The transformation of ‘Amphone’ into a super cyclone; West Bengal, Odisha are likely to be hit hard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.