वडनगर रेल्वे स्टेशनचा कायापालट

By Admin | Published: April 23, 2017 12:44 AM2017-04-23T00:44:21+5:302017-04-23T00:44:21+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी एके काळी जिथे चहा विकायचे, त्या रेल्वे स्टेशनचा लवकरच कायपालट होणार आहे. वडनगर रेल्वे स्टेशनला नवे रूप देण्यासाठी पहिल्या टप्प्यात ८ कोटी

Transformation of Vadnagar railway station | वडनगर रेल्वे स्टेशनचा कायापालट

वडनगर रेल्वे स्टेशनचा कायापालट

googlenewsNext

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी एके काळी जिथे चहा विकायचे, त्या रेल्वे स्टेशनचा लवकरच कायपालट होणार आहे. वडनगर रेल्वे स्टेशनला नवे रूप देण्यासाठी पहिल्या टप्प्यात ८ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याची घोषणा रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी येथे शुक्रवारी केली.
याशिवाय मोदी वडनगरमध्ये ज्या घरात राहात होते, त्याचा ताबा आता दुसऱ्या कुटुंबाकडे असला, तरी ते विकत घेऊन तिथे संग्रहालय बनवण्याचा प्रयत्न तेथील पर्यटक कंपन्यांनी चालविला आहे. त्या संग्रहालयाचे नेमके स्वरूप कसे असेल, हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, ते घर म्हणजे पर्यटन स्थळ बनवून, तिथे अधिकाधिक पर्यटकांना आणायचे, असा पर्यटक कंपन्यांचा मानस आहे. अर्थात, तिथे राहणाऱ्या कुटुंबाने त्या घराचा ताबा सोडला, तरच ते शक्य होईल.
मनोज सिन्हा म्हणाले की, या निधीतून वडनगर रेल्वे स्टेशनचा,
तसेच आसपासच्या परिसराचा
विकास करण्यात येणार आहे. मोदी यांनी २0१४ सालच्या लोकसभा निवडणुकाच्या प्रचारात आपण वडनगर रेल्वे स्टेशनबाहेर चहा विकायचो, असे सांगितले होते.
त्यांचा जन्मही वडनगरमध्येच झाला होता.
या प्रकल्पाची सविस्तर माहिती देताना अहमदाबादचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक दिनेश कुमार यांनी सांगितले की, मेहसाणा जिल्ह्यातील परिसरासहीत वडनगरचा विकास करण्यासाठी सुमारे १00 कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यातून वडनगर, मोधेरा आणि पाटण ही ठिकाणे विकसित करण्यात येतील. पर्यटन मंत्रालयाने स्टेशनचे रूप बदलण्यासाठी आतापर्यंत ८ कोटी रुपये दिले आहेत. (वृत्तसंस्था)

मालवाहतुकीचे वेळापत्रक
- प्रवासी गाड्यांप्रमाणेच लवकरच मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांचेही वेळापत्रक लागू करण्यावर विचार सुरू असल्याची माहिती मनोज सिन्हा यांनी दिली. सध्या मालवाहक गाड्यांचे वेळापत्रक नसल्याने त्यांची ये-जा कोणत्याही वेळेस सुरू असते.
त्यामुळे आम्ही एक पथदर्शक प्रकल्प हाती घेतला असून, पहिल्या टप्प्यात तीन ते चार मालवाहक गाड्या वेळापत्रकानुसार चालतील. तो यशस्वी झाल्यानंतर, सर्व मालगाड्यांबाबत निश्चित वेळापत्रक तयार करण्यात येईल.

Web Title: Transformation of Vadnagar railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.