महिलेच्या प्रसूतीदरम्यान ट्रान्सजेंडर्सनी दिला मदतीचा हात

By admin | Published: July 21, 2016 08:46 PM2016-07-21T20:46:39+5:302016-07-21T22:13:43+5:30

रेल्वे प्रवासांदरम्यान शक्यतो काही लोकांना ट्रान्सजेंडर्सना पाहिले की भीती वाटते. कारण काही ट्रान्सजेंडर्स प्रवाशांकडून बळजबरीने पैशांची मागणी करत असतात.

Transgenders help hand out during women's delivery | महिलेच्या प्रसूतीदरम्यान ट्रान्सजेंडर्सनी दिला मदतीचा हात

महिलेच्या प्रसूतीदरम्यान ट्रान्सजेंडर्सनी दिला मदतीचा हात

Next

ऑनलाइन लोकमत
केरळ, दि. 21 - रेल्वे प्रवासांदरम्यान शक्यतो काही लोकांना ट्रान्सजेंडर्सना पाहिले की भीती वाटते. कारण काही ट्रान्सजेंडर्स प्रवाशांकडून बळजबरीने पैशांची मागणी करत असतात. मात्र, एका 25 वर्षीय गरोदर महिलेला प्रसूतीच्यावेळी याच ट्रान्सजेंडर्सनी मदतीचा हात दिला.
झरिना बेगम असे या महिलेचे नाव असून ती आपल्या पती अल्लम मोहम्मद आणि दोन मुलांसह थिरुअनंतपुरम- गुवाहटी सुपरफास्ट एक्सप्रेसने प्रवास करत होती. त्यादरम्यान तिला प्रसूती वेदना होऊ लागल्या. यावेळी तिच्या पतीसह इतर प्रवासी घाबरले. कोणालाही काही करता येत नव्हते. सुरुवातीला प्रवाशांनी चेन खेचण्याचा प्लॅन केल्या. मात्र, त्यामार्गावर मेडिकल सुविधा नव्हती. त्यानंतर रेल्वे पोलिसांना यांसंबधी माहिती दिली असता, त्यांना वानीयामबडी स्टेशनपासून 60 किलोमीटर अंतरावर असणा-या काटपाडी स्टेशनला डॉक्टर आणि रूग्णसेवा कर्मचारी असल्याचे सांगण्यात आले. त्यादरम्यान तीन ट्रान्सजेंडर्सही याच एक्सप्रेसमधून प्रवास करत होते. त्यातील एका मालती नावच्या ट्रान्सजेंडर्सनं इतर दोन ट्रान्सजेंडर्सच्या मदतीनं झरिना बेगम हिच्या प्रसूतीच्यावेळी मदत केली. यामुळे झरिना बेगमनं एका गोंडस मुलाला जन्म दिला.


मालती या ट्रान्सजेंडर्सनं सरकारी रुग्णालयाच्या कामगार विभागातून प्रशिक्षण घेतलं असून सरकारच्या योजणेतून दोन वर्षाचा मेडिकल लॅबोरटरी टेक्नीशियनचा डिप्लोमा केला आहे.

 

Web Title: Transgenders help hand out during women's delivery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.