गोदावरीतर्फे वाहतूक सुरक्षा रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2016 11:56 PM2016-02-22T23:56:40+5:302016-02-22T23:56:40+5:30

वाहतूक सुरक्षा व हेल्मेट जनजागृती रॅली

Transport Safety Rally by Godavari | गोदावरीतर्फे वाहतूक सुरक्षा रॅली

गोदावरीतर्फे वाहतूक सुरक्षा रॅली

googlenewsNext
हतूक सुरक्षा व हेल्मेट जनजागृती रॅली
जळगाव- गोदावरी इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड रिसर्च जळगाव व रोटरॅक्ट क्लब जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक सुरक्षा व हेल्मेट वापरासंबधी जनजागृती रॅली सोमवारी काढण्यात आली. यात १०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. गोदावरी को.ऑप बँकेपासून सुरु झालेली ही रॅलीची टॉवर चौकात सांगता झाली. यावेळी राहुल मोरे, अभिजित मिटकर, सुमीत कुलकर्णी, ताबिश अली यांनी पथनाट्य सादर केले. यावेळी डॉ.गोविंद मंत्री,डॉ.प्रशांत वारके, प्रा.निलिमा वारके, प्रा.नितीन खर्चे, प्रा.मकरंद गोडबोले, प्रा.पुष्पलता पाटील, प्रा.स्मिता चौधरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

पोलिसावरील हल्ल्याचा समाजवादीतर्फे निषेध
जळगाव-लातूर जिल्ह्यातील पानगाव येथील पोलीस अधिकार्‍यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा समाजवादी पाटीतर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन निषेध नोंदविण्यात आला आहे.शासनाने समाजविघातक शक्तींच्या विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष मुफ्ती मो.हारून नदवी, जिल्हा सरचिटणीस अशफाक पिंजारी, नईम शेख, सैयद दानिश अहमद, रिझवान फलाही यांच्यासह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

आर.डी.ची रक्कम तत्काळ मिळावी
जळगाव- टपाल विभागात उघडलेल्या आर.डी.खात्यातील रक्कम आपल्याला वैद्यकीय कारणासाठी मिळावी या आशयाचे निवेदन आर.एन.भावसार यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे. भावसार यांचे कलेक्टर सब पोस्ट ऑफिसमध्ये आर.डी.चे खाते आहे. त्यांना वैद्यकीय कारणासाठी तत्काळ पैशांची आवश्यकता आहे. त्यासाठी ते टपाल विभागाच्या मुख्य कार्यालयात जावून अधीक्षकांना भेटले. मात्र तीन वर्षापर्यंत आर.डी.च्या खात्यातील रक्कम मिळणार नसल्याचे सांगत त्यांना परत पाठविण्यात आले. खातेदाराला वैद्यकीय कारणासाठी रक्कम मिळत नसल्यास बचत खाते का उघडावे आणि शासनाने त्यासाठी सक्ती का करावी असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

Web Title: Transport Safety Rally by Godavari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.