प्रवासी बसमधून गोमांसाची वाहतूक

By admin | Published: July 31, 2015 12:52 AM2015-07-31T00:52:08+5:302015-07-31T00:52:08+5:30

पणजी पोलिसांकडून 225 किलो मांस जप्त

Transportation of Gomansashi passenger buses | प्रवासी बसमधून गोमांसाची वाहतूक

प्रवासी बसमधून गोमांसाची वाहतूक

Next
जी पोलिसांकडून 225 किलो मांस जप्त
3 अटकेत
पणजी : मुंबईहून गोव्यात येणार्‍या पॅसेंजर बसमधून गोमांसाची बेकायदा वाहतूक करणारी तिघांची टोळी पणजी पोलिसांनी गुरुवारी पकडली. गोवा प्राणी संरक्षण कायद्याखाली त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला.
अटक करण्यात आलेल्यांत ताखत सिंग (43), दशरथ खेम्राज गुजर (35, दोघेही मध्य प्रदेश) अणि मुझफ्फर रेहमान (46, उत्तर प्रदेश) हे संशयित आहेत. मुंबईहून मांस गोवत अणायचे आणि बाजारात विकायचे हा त्यांचा धंदा बर्‍याच काळापासून तयार होता. अत्यंत घाणेरड्या पद्धतीने मांसाची वाहतूक केली जात होती. मंसाचे गोळे पिशवीत घालून तशा पिशव्यांचे बॉक्स बनविले जायचे. असे चार बॉक्स पोलिसांनी जप्त केले आहेत. एकूण 225 किलो मांस पोलिसांनी जप्त केल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक शराफीन डायस यांनी दिली.
तिसरा संशयित मुझफ्फर रेहमान हा या मांसाचा पणजीत पुरवठा करीत होता, अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. या प्रकरणात आणखी माहिती पोलीस मिळवीत असून संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. जप्त केलेल्या मांसाची विल्हेवाट लावण्यात आली.

Web Title: Transportation of Gomansashi passenger buses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.