वाळूची चोरटी वाहतुक करणार्या ट्रॅक्टरने चिरडले तरुणाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2015 11:51 PM2015-12-29T23:51:28+5:302015-12-29T23:51:28+5:30
जळगाव: वाळूची चोरटी वाहतुक करणार्या ट्रॅक्टरने रस्त्यावर असलेल्या गोपाळ संतोष नन्नवरे (वय २२ रा.खेडी खुर्द ता.जळगाव) या तरुणाला चिरडल्याची घटना सोमवारी मध्यरात्री एक वाजता कानळदा-जळगाव रस्त्यावर आव्हाणे फाट्यानजीक असलेल्या हॉटेल लक्ष्मीसमोर घडली. अपघातानंतर चालक ट्रॅक्टर सोडून फरार झाला आहे. वाळू वाहतुक करणार्या वाहनाने घेतलेला आठवड्यातील हा तिसरा बळी आहे.
ज गाव: वाळूची चोरटी वाहतुक करणार्या ट्रॅक्टरने रस्त्यावर असलेल्या गोपाळ संतोष नन्नवरे (वय २२ रा.खेडी खुर्द ता.जळगाव) या तरुणाला चिरडल्याची घटना सोमवारी मध्यरात्री एक वाजता कानळदा-जळगाव रस्त्यावर आव्हाणे फाट्यानजीक असलेल्या हॉटेल लक्ष्मीसमोर घडली. अपघातानंतर चालक ट्रॅक्टर सोडून फरार झाला आहे. वाळू वाहतुक करणार्या वाहनाने घेतलेला आठवड्यातील हा तिसरा बळी आहे.मित्रांसोबत आला होता हॉटेलवर जेवायला गोपाळ हा दारु पिवून संध्याकाळी गावात गेला होता. तेथे त्याला त्याचे मित्र भेटले. त्यांना जेवणासाठी हॉटेलमध्ये येण्याची विनंती केली, मात्र आमच्याकडे बील भरायला पैसे नाहीत म्हणून मित्रांनी नकार दिला. तुम्ही चला बील मी भरतो असे सांगून त्याने पांडुरंग आनंदा सोनवणे (वय २७), समाधान भगवान सोनवणे (वय २८), समाधान भागवत रंधे (वय ३१), प्रवीण गोकुळ सपकाळे (वय २५), समाधान कडू सपकाळे (वय ३६), गणेश आधार साळुंखे व समाधान मांगिलाल सोनवणे (वय ३१) सर्व रा.खेडी खुर्द ता.जळगाव यांना सोबत घेवून कानळदा रस्त्यावरील हॉटेल लक्ष्मीमध्ये जेवायला आले. वाहने अडविणे पडले महागातहॉटेलवर दारु व जेवण झाल्यानंतर गोपाळ हा रात्री एक वाजता रस्त्यावर आला. चोरटी वाहतुक करणार्या वाहनांना अडवून त्यांच्याकडून पैसे गोळा करु असे त्याने त्याच्या मित्रांना सांगितले. यावेळी बर्याच जणांनी त्याला विरोध केला. परंतु, तरीही गोपाळ याने रस्त्यावर दुचाकी आडवी लावून वाहने वाळूची अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही वाहने थांबली तर काही थांबली नाहीत. अशातच एम.एच.२३ बी.८१७४ क्रमांकाचे वाळूने भरलेले ट्रॅक्टर आले. त्याला गोपाळने आडवे होवून थांबविण्याचा प्रयत्न केला, परंतु चालकाने न थांबता थेट त्याच्या अंगावरुन ट्रॅक्टर नेले. त्यात त्याला जोरदार फटका बसून शरीरातील आतडे बाहेर आले व तो जागीच गतप्राण झाला. गोपाळला धडक लागल्याचे पाहून चालकाने ट्रॅक्टर भरधाव वेगाने पुढे नेले. यावेळी प्रवीण सपकाळे याने त्याचा पाठलाग केला. ट्रॅक्टरच्या धडकेत गोपाळचा मृत्यू झाल्याचे समजताच चालकाने रस्त्यावर ट्रॅक्टर सोडून केळी बागेतून पळ काढला.