मलनिस्सारण कामामुळे घोगळातील रस्त्यांची दुर्दशा

By admin | Published: August 11, 2015 11:45 PM2015-08-11T23:45:11+5:302015-08-11T23:45:11+5:30

मडगाव : जायकाच्या मलनिस्सारण वाहिन्यांच्या कामाचा फटका गेली दोन वर्षांपासून घोगळ येथील गृहनिर्माण मंडळ वसाहतीतील रहिवाशांना बसला आहे. खंदक विरहित नव्या तंत्रज्ञानाने या वाहिन्या घातल्या जातील. त्यामुळे लोकांना कसलाच त्रास होणार नाही, असे आश्वासन तत्कालीन राज्यकर्ते व कंत्राटदारांनी दिला होता.

Traumatic Road Traffic Dangers | मलनिस्सारण कामामुळे घोगळातील रस्त्यांची दुर्दशा

मलनिस्सारण कामामुळे घोगळातील रस्त्यांची दुर्दशा

Next
गाव : जायकाच्या मलनिस्सारण वाहिन्यांच्या कामाचा फटका गेली दोन वर्षांपासून घोगळ येथील गृहनिर्माण मंडळ वसाहतीतील रहिवाशांना बसला आहे. खंदक विरहित नव्या तंत्रज्ञानाने या वाहिन्या घातल्या जातील. त्यामुळे लोकांना कसलाच त्रास होणार नाही, असे आश्वासन तत्कालीन राज्यकर्ते व कंत्राटदारांनी दिला होता.
या कामासाठी वसाहतीतील रस्ता खोदण्यात आला. तसेच मातीचे ढिगारे रस्त्यावर साठवून ठेवण्यात आले. त्यामुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरलेले. शिवाय वाहतुक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला. तसेच ढिगारे हटविण्यात आल्या नसल्याने पावसाळ्यात रस्ते चिखलमय बनले आहे. संबंधीतांनी याकडे कानाडोळा केल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरलेली आहे.
उन्हाळ्यात खोदलेले रस्ते बुजवून त्यावर डांबराचे पॅचवर्क करण्यात आले. मात्र, पावसाळ्यात हे पॅच धुऊन गेल्याने रस्त्याची चाळन बनली आहे. त्यामुळे रस्ता वाहतूकीसाठी निकृष्ट बनला आहे. घोगळ जंक्शन ते अनुराधा अपार्टमेंट पर्यंत रस्त्याची अवस्था दयनीय बनलेली आहे. या रस्त्यावर भूमिगत वाहिन्या घालण्याचे काम पावळापूर्वी सुरू करण्यात आले होते. मात्र, पावळा सुरू झाला तरी कामे पूर्ण करण्यात आली नाहीत. शिवाय कामे अर्धवट स्थितीत सोडून देण्यात आली. त्यामुळे ठिकठिकाणी रस्ते उखडलेले स्थितीत दिसतात. त्याचबरोबर चिन्मय आर्शमाकडे जाणार्‍या रस्त्याच्या जंक्शनजवळ खड्याचे जाळे पसरलेले आहे. त्यामुळे संबंधीतांचे या रस्त्याकडे कसलेच नियंत्रण नसल्याची टिका होत आहे. (प्रतिनिधी)



Web Title: Traumatic Road Traffic Dangers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.