व्हीलचेअरने नेत असताना प्रवासी महिला पडली, इंडिगोची चूक भोवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 01:09 AM2017-11-14T01:09:29+5:302017-11-14T01:10:07+5:30

लखनौ विमानतळावर इंडिगो विमानातील प्रवासी महिलेला व्हीलचेअरने नेत असताना ती पडून जखमी झाली. कर्मचा-यांच्या चुकीने शनिवारी घडलेल्या घटनेनंतर इंडिगोने दिलगिरी व्यक्त केली.

Traveler lady falls while wheelchair leads, indigo error is bad | व्हीलचेअरने नेत असताना प्रवासी महिला पडली, इंडिगोची चूक भोवली

व्हीलचेअरने नेत असताना प्रवासी महिला पडली, इंडिगोची चूक भोवली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : लखनौ विमानतळावर इंडिगो विमानातील प्रवासी महिलेला व्हीलचेअरने नेत असताना ती पडून जखमी झाली. कर्मचा-यांच्या चुकीने शनिवारी घडलेल्या घटनेनंतर इंडिगोने दिलगिरी व्यक्त केली.
विमानतळावरील मार्गावर पडलेल्या भेगेमुळे महिला व्हीलचेअरमधून पडल्याचा दावा इंडिगोने केला. एअर पोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाने कंपनीच्या कर्मचा-यांच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचा ठपका ठेवला. काही दिवसांपूर्वी दिल्ली विमानतळावर प्रवाशाला धक्काबुक्की झाल्याचा व्हिडीओ सगळीकडे पसरल्यानंतर इंडिगोवर जोरदार टीका झाली होती. त्याबद्दलही कंपनीने दिलगिरी व्यक्त केली होती.
इंडिगोच्या प्रवक्त्याने प्रवासी महिला उर्वशी पारीख या जखमी झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. त्यात म्हटले आहे की, इंडिगोचे कर्मचारी व्हीलचेअर ढकलत होते. वाहनांच्या रांगेतून नेत असताना ती खोल भेगेमध्ये अडकली. त्यांचा तोल गेला व त्या पडल्या. त्या भागात रात्री अंधार होता.

Web Title: Traveler lady falls while wheelchair leads, indigo error is bad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.