लासलगावला तुरीच्या शेंगा लागून झाडे झुकली
By admin | Published: December 7, 2015 12:02 AM2015-12-07T00:02:22+5:302015-12-07T00:02:22+5:30
Next
>लासलगाव : निसर्गाची किमया किती न्यारी असते याची प्रचिती लासलगाव येथील रामदास मालुंजकर यांच्या लासलगाव येथील कोटमगाव रस्त्यावर असलेल्या निवासस्थानी तुरीच्या शेंगा लागुन वजनाने खाली जमिनीकडे झुकलेल्या भरघोस पिकाने येते. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सेवेत रामदास यांचे वडील जयराम मालुंजकर होते. त्यांनी तुरीचे झाडे लासलगाव कोटमगाव रस्त्यावर असलेल्या निवासस्थानाबाहेर लावलेले आहेत. वर्षातून दोनदा या झाडांना तुरी येतात. परंतु यावर्षी शेणखताचा वापर चांगला केला. त्यामुळे या झाडाला इतके मोठ्या प्रमाणावर तुरीच्या शेंगा आलेल्या आहेत की वजनाने झाडे जमीनीकडे झुकलेल्या आहेत. भरघोस पिक पाहण्यास मोठ्या प्रमाणावर लोकांनी गर्दी केली आहे असे मालुंजकर यांनी सांगितले. (वार्ताहर)फोटो ओळ : लासलगाव येथील रामदास जयराम मालुंजकर यांच्या लासलगाव येथील कोटमगाव रस्त्यावर असलेल्या निवासस्थानी तुरीच्या शेंगा लागुन वजनाने खाली जमिनीकडे झुकलेल्या भरघोस पिक आले ते दाखिवत आहेत.