७६५ केव्ही विद्युत प्रवाहाच्या तारांखालील झाडे वाळू लागली- फोटो

By Admin | Published: December 25, 2015 11:58 PM2015-12-25T23:58:25+5:302015-12-25T23:58:25+5:30

घाटनांद्रा : भुसावळ ते औरंगाबाद या ७६५ केव्ही विद्युत वाहिनीच्या तारांखाली येणारे झाडे विद्युत प्रवाहाने वाळून जात असल्याने कंपनीने नुकसानभरपाई देण्याची मागणी या भागातील शेतकर्‍यांनी केली आहे.

The trees under the stars of 765 KV electric current went off - photo | ७६५ केव्ही विद्युत प्रवाहाच्या तारांखालील झाडे वाळू लागली- फोटो

७६५ केव्ही विद्युत प्रवाहाच्या तारांखालील झाडे वाळू लागली- फोटो

googlenewsNext
टनांद्रा : भुसावळ ते औरंगाबाद या ७६५ केव्ही विद्युत वाहिनीच्या तारांखाली येणारे झाडे विद्युत प्रवाहाने वाळून जात असल्याने कंपनीने नुकसानभरपाई देण्याची मागणी या भागातील शेतकर्‍यांनी केली आहे.
महापारेषण या विद्युत कंपनीच्या वतीने भुसावळ ते औरंगाबाद वीज पुरवठ्यात वाढ करण्यासाठी भोपाळ-धुळे ट्रान्समिशन कंपनीला टॉवर व तारा ओढण्याचे काम दिलेले होते. या कंपनीच्या वतीने २०१३ मध्ये हे काम करण्यात आले असून या तारांमधून जाणारा वीज प्रवाह ७६५ केव्ही अश्वशक्तीचा असल्यानेया ताराखालील जमिनीत किंवा झाडांवर वीज प्रवाह उतरत असल्याने मोठी हानी होत आहे. तारा खालील फळबाग, आंबा, जांभूळ, बोर, चिंच व इतर झाडे वाळून जात असल्याची तक्रार शेतकर्‍यांनी केली आहे.
शिवाय टॉवरच्याखाली आलेल्या जमिनीत पेरणी केल्या जात नसल्याने शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून महापारेषण विद्युत कंपनीने इंडियन टेलि--- कायदा १८८५ व इलेक्ट्रीसिटी कायदा २००३ सेक्शन ४८ च्या तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्याच्या महसुली खात्यातून किंवा कंपनीकडून शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देण्याचा अधिकार असल्याने कंपनीने ताराखालील झाडांचे होणारे व टॉवरखालील अधिग्रहीत झालेल्या जमिनीचे नुकसान पाहता त्वरीत नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकसान ग्रस्त शेतकरी जगन भीमराव मोरे, सुरेश ---, तुकाराम पांडुरंग मोरे, गंगाधर लक्ष्मण मोरे, शिवाजी नारायण मोरे व इतर शेतकर्‍यांनी केली आहे.

Web Title: The trees under the stars of 765 KV electric current went off - photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.