दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात भूकंपाचे धक्के
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 08:02 PM2019-11-19T20:02:49+5:302019-11-19T20:06:30+5:30
भूकंपाचे धक्के बसल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दिल्ली-एनसीआर, लखनऊ, चंदीगड, नोएडा, गुरुग्रामसह उत्तर भारतातील काही शहरांमध्ये मंगळवारी भूकंपाचे धक्के बसले.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, उत्तर भारतात आज संध्याकाळी सात वाजता भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाचा केंद्रबिंदू भारत-नेपाळ सीमेजवळ असल्याचे सांगण्यात येते. तसेच, या भूकंपाची तीव्रता 5.3 रिश्टर स्केल इतकी असून . दिल्ली-एनसीआर, लखनऊ, चंदीगड, नोएडा, गुरुग्रामसह उत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के बसले आहेत.
5.3 magnitude earthquake strikes Nepal
— ANI Digital (@ani_digital) November 19, 2019
Read @ANI Story | https://t.co/cRhX1UJBWjpic.twitter.com/dHQNiuPbEV
दरम्यान, भूकंपाचे धक्के बसल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच, लोकांना भीतीपोटी घराबाहेर तसेच कार्यालयाबाहेर पडावे लागले. याआधी सप्टेंबर महिन्यात दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे धक्के बसले होते.