सासरच्या घरासमोर आंदोलनाला बसलेल्या शालिनीची दुसरी बाजू समोर आली; हनिमूनला तिने हातही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 17:41 IST2025-04-01T17:40:19+5:302025-04-01T17:41:01+5:30
एका नवविवाहित जोडप्याची देशभरात खूप चर्चा होत आहे. पत्नी शालिनी संगलने सासरच्यांवर घरात घेत नसल्याचा आरोप करून आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे.

सासरच्या घरासमोर आंदोलनाला बसलेल्या शालिनीची दुसरी बाजू समोर आली; हनिमूनला तिने हातही...
सध्या उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमधील एका नवविवाहित जोडप्याची देशभरात खूप चर्चा होत आहे. पत्नी शालिनी संगलने सासरच्यांवर घरात घेत नसल्याचा आरोप करून आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे. हनिमूनहून परत आल्यावर मला माहेरी सोडले ते पुन्हा पती प्रणव सिंघल घ्यायला आले नाहीत, मी स्वत: सासरी आले तरी मला घरात घेतले नाही, असा आरोप ही महिला करत आहे. तर आता या आरोपांनंतर पती प्रणव यांची बाजु समोर आली आहे.
प्रणव यांनी एक पत्रकार परिषद घेतली आहे. यामध्ये त्यांनी शालिनीने लग्न झाल्यापासून एकदाही आपल्याला शरीर संबंध ठेवायला दिले नाहीत. मी जेव्हा जेव्हा तिला जवळ घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा तिने मला हात लावायचा नाही असे सांगत जर हात लावला तर तुरुंगात पाठवेन नाहीतर मारून टाकेन अशी धमकी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच या बाईने वकिली केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
माझ्या मर्जीविरोधात माझ्या वडिलांनी तुमच्याशी लग्न लावले आहे. त्यांच्या मर्जीने मी हे लग्न केले आहे. मला तुमच्याशी लग्न करायचे नव्हते, असेही ती सांगत असल्याचा आरोप प्रणव यांनी केला आहे. शालिनीपासून आपल्या जिवाला धोका आहे, मेरठच्या निळ्या ड्रमसारखा किंवा मुझफ्फरनगर सारख्या कॉफीमध्ये विष घालून दिले त्यासारखी ती मला पण ठिकाण्यावर लावून देईल अशी भीती वाटत असल्याचे प्रणव यांनी सांगितले.
आम्ही गेल्या तीन दिवसांपासून घरी नव्हतो. यामुळे शालिनीला घरात जाता आले नाहीय. आता येऊन पाहतो तर ती आंदोलनाला बसली आहे आणि वाईट आरोप करत सुटली आहे. पोलिसही काही कारवाई करत नसल्याचा आरोप प्रणव यांनी केला आहे.