सिध्देश्वर मंदिरात त्रिदिनात्मक कार्यक्रम

By Admin | Published: February 14, 2015 11:52 PM2015-02-14T23:52:07+5:302015-02-14T23:52:07+5:30

नेवासा : तालुक्यातील टोका येथील श्री सिध्देश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त त्रिदिनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सोळा ते अठरा फेब्रुवारी या कालावधीत हा कार्यक्रम होणार आहे.

Triadiente program in Siddeshwar temple | सिध्देश्वर मंदिरात त्रिदिनात्मक कार्यक्रम

सिध्देश्वर मंदिरात त्रिदिनात्मक कार्यक्रम

googlenewsNext
वासा : तालुक्यातील टोका येथील श्री सिध्देश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त त्रिदिनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सोळा ते अठरा फेब्रुवारी या कालावधीत हा कार्यक्रम होणार आहे.
सोळा रोजी सकाळी महारुद्र यज्ञ होईल. सतरा रोजी महाशिवरात्रीनिमित्त पॅराशुटव्दारे मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात येईल. मंदिर प्रांगणात होमहवनसह वेदमंत्राच्या जयघोषात सिध्देश्वर शिवलिंगास महारुद्र अभिषेक घालण्यात येईल. अठरा रोजी हभप महामंडलेश्वर भागवतानंदगिरी महाराज यांचे प्रवचन तर हभप अशोक महाराज पांडव, हभप दुर्गाताई बिडकीनकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सोहळ्याची सांगता होईल.
रस्त्याअभावी गैरसोय
नेवासा : तालुक्यातील बहिरवाडी-माकोटावस्ती हा शिवरस्ता खुला करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिलीप आढागळे यांनी केली आहे. या मागणीचा ठराव संमतही झालेला असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Triadiente program in Siddeshwar temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.