तीन वृत्तवाहिन्यांवर खटला दाखल होणार

By admin | Published: March 7, 2016 10:39 PM2016-03-07T22:39:04+5:302016-03-10T18:20:23+5:30

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात(जेएनयू) ९ फेब्रुवारी रोजी झालेल्या कार्यक्रमाच्या टेपमध्ये छेडछाड करीत प्रसारण करणाऱ्या तीन वृत्त वाहिन्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा आदेश दिल्ली सरकारने दिला आहे.

The trial will be filed on three TV channels | तीन वृत्तवाहिन्यांवर खटला दाखल होणार

तीन वृत्तवाहिन्यांवर खटला दाखल होणार

Next

दिल्ली -  जवाहरलाल नेहरू विद्यापीठात(जेएनयू) ९ फेब्रुवारी रोजी झालेल्या कार्यक्रमाच्या टेपमध्ये छेडछाड करीत प्रसारण करणाऱ्या तीन वृत्त वाहिन्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा आदेश दिल्ली सरकारने दिला आहे.
फासावर लटकविण्यात आलेला संसद हल्ल्यातील आरोपी अफजल गुरू याचे उद्दातीकरण आणि देशविरोधी घोषणा देण्यात येत असल्याचे या टेपमध्ये दाखविण्यात आले आहे.
देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक होऊन नुकताच कारागृहातून बाहेर आलेला जेएनयूचा विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हैया हा देशविरोधी घोषणा देत असल्याचे या टेपमध्ये दाखविण्यात आल्यानंतर वाद उफाळला होता.
दिल्ली सरकारने याबाबत तीन वृत्तवाहिन्यांवर कायदेशीर खटल्याची प्रक्रिया चालविण्याचा आदेश सरकारी वकिलांना दिला आहे. काही लोक ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे घोषणा देत असल्याचे व्हिडिओ फुटेजमध्ये दिसल्यामुळे हे वृत्त देश पातळीवर चर्चेचा विषय बनले होते.
अभाविपने एका पत्रकाराला बोलावून हा व्हिडिओ घेतला होता. विद्यापीठाच्या द्वारावरील प्रवेशपुस्तिकेतही तशी नोंद करण्यात आली होती. दंडाधिकाऱ्यांनी सदर वृत्तवाहिन्यांना टेप सादर करण्याचा आदेश दिल्यानंतर तो पाळला गेला नव्हता. (लोकमत न्यूज नेटवर्क)

 

Web Title: The trial will be filed on three TV channels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.