चीनी अॅप Tiktok च्या प्रोफाईलमध्ये झळकला तिरंगा, भारतीयांनी चांगलंच सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2020 12:22 IST2020-06-28T12:21:54+5:302020-06-28T12:22:49+5:30
भारत आणि चीन सीमारेषेवर तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने आणि गलवान खोऱ्यात 20 भारतीय जवानांना वीरमरण प्राप्त झाल्यानंतर देशातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

चीनी अॅप Tiktok च्या प्रोफाईलमध्ये झळकला तिरंगा, भारतीयांनी चांगलंच सुनावलं
मुंबई - सोशल मीडियावरील प्रसिद्ध चायना अॅप टीकटॉकने आपल्या प्राफाईल पिक्चरमध्ये शनिवारी सायंकाळी भारतीय तिरंगा ध्वजाचे छायाचित्र घेतले आहे. त्यानंतर, युजर्संने टीकटॉक अॅपबद्दल तीव्र संताप व्यक्त करत कमेंटच्या माध्यमातून कंपनीला चांगलंच सुनावलंय. अॅपबद्दल भारतीय युजर्संची नाराजी लक्षात घेऊन कंपनीने असं केलं होतं. मात्र, प्रोफाईल पिक्चरवर तिरंगा झळकल्याने भारतीययुजर्सं आणखी नाराज झाले आहेत.
भारत आणि चीन सीमारेषेवर तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने आणि गलवान खोऱ्यात 20 भारतीय जवानांना वीरमरण प्राप्त झाल्यानंतर देशातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच, देशभरातून चीनी मालावर बहिष्कार घाला, अशी मोहिमही विविध संघटनांकडून राबविण्यात आली. चीनी सामानावर बहिष्कार या हेतुनेच चायना मोबाईल आणि चीनी अॅपही अनइन्सटॉल करुन भारतीयांनी चीनी कंपन्यांना दणका दिला.
शनिवारी सायंकाळी टीकटॉकने आपल्या अॅपच्या प्रोफाईलमध्ये तिरंगा ध्वज झळकावला, त्यानंतर सोशल मीडियातून अनेक युजर्संने नाराजी व्यक्त करत कंपनीला खडेबोल सुनावले. या प्रोफाईल फोटोच्या कमेंटमध्ये युजर्संने RIP लिहून संताप, राग आल्याच्या इमोजीही दर्शवल्या आहेत. भारत आणि चीनच्या सीमारेषेवरील तणावाचा फटका भारतात असलेल्या चीनी कंपन्यांना बसला आहे. देशात चायना मालाची विक्री करणाऱ्या चायनीज कंपनींच्या बिझनेसचे मोठे नुकसान झाले आहे. भारतीय नागरिकानी चीनी अॅप्स मोबाईलमधून अनइन्स्टॉल केले आहे. टीकटॉक, Helo, Likee आणि PUBG यांसारखे अॅप्सही मोठ्या प्रमाणात अनइन्स्टॉल झाले आहेत. त्यामुळे या कंपनींच्या जाहिरात बिझनेवर परिणाम झाला आहे.
सेन्सॉर टाऊनच्या अहवालानुसार, लाईव्ह स्ट्रीमिंग अॅप्स, शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अॅप लाईकी आणि गेमिंग अॅप PUBG च्या डाऊनलोडमध्ये जुन महिन्यात मोठी घट झाल्याचे दिसून आले. तर, टिकटॉक आणि हेलो अॅपच्या डाउनलोडमध्ये एप्रिल महिन्यांपासूनच घट झाली आहे.