तिरंग्याचा अवमान, अॅमेझॉनवर कडक कारवाईचा इशारा
By admin | Published: January 12, 2017 12:11 AM2017-01-12T00:11:22+5:302017-01-12T00:33:31+5:30
अमेझॉनच्या वेबसाईटवर भारताच्या राष्ट्रध्वजासारखी पायपुसणी विक्रीला ठेवण्यात आली आहेत. याची दखल घेत स्वराज यांनी याची विक्री त्वरित थांबवण्यास आणि बिनशर्त माफी मागण्यास सांगितलं
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11 - अॅमेझॉन या इ-कॉमर्स वेबसाईटवर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. कॅनडा येथील अॅमेझॉनच्या वेबसाईटवर भारताच्या राष्ट्रध्वजासारखी पायपुसणी विक्रीला ठेवण्यात आली आहेत. याची दखल घेत स्वराज यांनी याची विक्री त्वरित थांबवण्यास आणि बिनशर्त माफी मागण्यास सांगितलं आहे.
आमच्या तिरंग्याचा अपमान करणा-या सर्व उत्पादनांना त्वरित हटवा अन्यथा आम्ही अॅमेझॉनच्या अधिका-यांना व्हिसा देणार नाही तसेच सध्या ज्या अॅमेझॉनच्या कर्मचाऱ्यांकडे भारताचा व्हिसा आहे त्यांचा व्हिसा रद्द करू असा इशारा स्वराज यांनी ट्विटरद्वारे दिला आहे.
Indian High Commission in Canada : This is unacceptable. Please take this up with Amazon at the highest level. https://t.co/L4yI3gLk3h
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) 11 January 2017
अतुल भोबे नावाच्या एका व्यक्तिने स्वराज यांना ट्वीट करून कॅनडामध्ये विकल्या जात असलेल्या या पायपुसणीबद्दल माहिती दिली होती आणि यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.
If this is not done forthwith, we will not grant Indian Visa to any Amazon official. We will also rescind the Visas issued earlier.
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) 11 January 2017
स्वराज यांनी कॅनडातील भारतीय उच्च-आयोगाला हे प्रकरण अॅमेझोन कॅनडाच्या उच्च अधिका-यांच्या निदर्शनास आणण्यास सांगितलं आहे.