तृणमूल काँग्रेसच्या महिला खासदाराला कन्यारत्न; नाव तिचे...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 07:40 PM2020-05-07T19:40:25+5:302020-05-07T19:42:44+5:30
कोरोनाच्या भीषण संकटात जन्माला आल्याने या मुलीचे नाव या खासदाराने कोरोना ठेवले आहे. या महिला खासदाराचे नाव अपरुपा पोद्दार असे आहे.
कोलकाता : एकीकडे देश लॉकडाऊन असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारविरोधात आधी टीका करण्याची भूमिका घेतली होती. आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी केंद्राला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. पश्चिम बंगालसह देशभरात कोरोनामुळे परिस्थिती बिघडत चालली असून या कठीण काळात तृणमूल काँग्रेसच्या महिला खासदाराने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.
कोरोनाच्या भीषण संकटात जन्माला आल्याने या मुलीचे नाव या खासदाराने कोरोना ठेवले आहे. या महिला खासदाराचे नाव अपरुपा पोद्दार असे आहे. बंगालमधील हुगली जिल्ह्यातील एका हॉस्पिटलमध्ये या मुलीने जन्म घेतला आहे. पोद्दार यांनी या मुलीचे टोपन नाव कोरोना ठेवले आहे. अपरुपा या तृणमूल काँग्रेसकडून दोनदा खासदार झाल्या आहेत.
जेव्हा जग कोरोनाविरोधात लढत होते, तेव्हा माझ्या पोटी मुलीने जन्म घेतला आहे. यामुळे आम्ही तिचे टोपन नाव कोरोना ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, असे पोद्दार यांनी सांगितले. महत्वाचे म्हणजे अपरुपा यांचीही दोन नावे आहेत. त्यांना आफरीन अली या नावानेही ओळखले जाते. तिचे पती शकीर अली यांनी सांगितले की, ही मुलगी आमचे दुसरे अपत्य आहे. ती कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊनमध्ये जन्माला आली आहे. यामुळे तिचे नाव कोरोना असणार आहे.
ममता बॅनर्जी करणार बारसा?
पोद्दार यांनी सांगितले की, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मुलीचे मुख्य नाव सुचविणार आहेत. यासाठी त्यांना विनंती करण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या...
अख्खा देश कोरोनाच्या धास्तीने घरात असताना परदेशी पर्यटकांकडून किनाऱ्यावर मौजमजा
SBI कडून लॉकडाऊनमध्ये मोठा दिलासा; कर्जाच्या व्याजदरात कपात
पाकव्याप्त काश्मीरमध्ये काहीतरी मोठे घडणार?; भारतीय हवामान विभागाचा इशारा
रहस्यमय...! भारतातील शेवटचे गाव; जिथे आजही महाभारतातील पूल अस्तित्वात
कल्याणमध्ये ऑनलाईन फूड डिलिव्हरी बॉयला कोरोना; आज २० रुग्ण सापडले