माेदींच्या शपथविधीला तृणमूलचे खासदार जाणार नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2024 06:16 IST2024-06-09T06:15:01+5:302024-06-09T06:16:10+5:30
Trinamool Congress: आमचा पक्ष नव्या सरकारच्या शपथविधी समारंभात सहभागी हाेणार नाही, असे तृणमूल काॅंग्रेसच्या नेत्या व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले.

माेदींच्या शपथविधीला तृणमूलचे खासदार जाणार नाहीत
काेलकाता - विराेधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीने सत्ता स्थापनेचा दावा केलेला नसला, तरीही भविष्यात तसे करणार नाही, असा अर्थ हाेत नाही. पाहा आणि प्रतीक्षा करा, अशी आपल्या पक्षाची रणनिती राहणार आहे. आमचा पक्ष नव्या सरकारच्या शपथविधी समारंभात सहभागी हाेणार नाही, असे तृणमूल काॅंग्रेसच्या नेत्या व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले.
ममता बॅनर्जी यांनी पक्षाच्या खासदारांची बैठक घेऊन लाेकसभेत पक्षाची रणनिती काय असावी, याबाबत चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बाेलताना ममता म्हणाल्या, एनडीएचे सरकार सत्तेबाहेर गेल्यास आनंद हाेईल. ‘सीएए’ कायदा रद्द करण्याची मागणी तृणमूलचे खासदार संसदेत लावून धरतील.