Mamata Banerjee : ‘तृणमूल काँग्रेस’ लढणार पाच  राज्यांत विधानसभा; भाजप, काँग्रेसची हानी करण्याचे ममता बॅनर्जींचे धोरण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 08:33 AM2021-10-25T08:33:43+5:302021-10-25T08:34:03+5:30

Mamata Banerjee : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गुजरातमध्ये भाजपमधील बंडखोरांना आम आदमी पक्ष (आप) आणि टीएमसी आपली दारे खुली करील. गुजरातमधील काँग्रेसच्या एका गटाशी टीएमसीने आधीच संपर्क साधला आहे. 

Trinamool to contest assembly elections in five states; Banerjee's policy to harm BJP, Congress pdc | Mamata Banerjee : ‘तृणमूल काँग्रेस’ लढणार पाच  राज्यांत विधानसभा; भाजप, काँग्रेसची हानी करण्याचे ममता बॅनर्जींचे धोरण

Mamata Banerjee : ‘तृणमूल काँग्रेस’ लढणार पाच  राज्यांत विधानसभा; भाजप, काँग्रेसची हानी करण्याचे ममता बॅनर्जींचे धोरण

Next

- व्यंकटेश केसरी 

नवी दिल्ली : पुढील वर्षी पाच राज्यांत होणारी विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतला आहे. भाजप आणि काँग्रेसची हानी करण्याचा यामागे उद्देश आहे.

टीएमसीचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील सभेत म्हटले की, “येत्या तीन महिन्यांत आमचा पक्ष आणखी पाच राज्यांत पोहोचलेला असेल याची मी खात्री देऊ शकतो.” सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विधानसभा निवडणूक होणार असलेल्या पाच राज्यांत भाजपला दुबळे करण्याचे ममता बॅनर्जी यांचे धोरण आहे.

त्यानुसार उत्तराखंड व गोव्यासारख्या छोट्या राज्यांत विधानसभा अंधांतरी होऊ द्यावी आणि भाजप सत्तेवर असलेल्या उत्तर प्रदेश आणि गुजरातमधील अंतर्गत कलहाचा लाभ घेऊन भाजपला धक्का द्यायचा. पुढील वर्षी राष्ट्रपतिपदासाठी होत असलेल्या निवडणुकीत उत्तर प्रदेश व गुजरातला मोठे महत्त्व असेल.

टीएमसीला सध्या निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचे साह्य होत आहे. टीएमसीने गोव्यात निवडणूक लढविण्याचा घेतलेला निर्णय काँग्रेसला निराश करणारा आहे. त्यामुळे भाजप सावध होईल. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गुजरातमध्ये भाजपमधील बंडखोरांना आम आदमी पक्ष (आप) आणि टीएमसी आपली दारे खुली करील. गुजरातमधील काँग्रेसच्या एका गटाशी टीएमसीने आधीच संपर्क साधला आहे. 

बंडखोरांचे स्वागत
भाजपच्या संघटनेत वेगवेगळी कारणे दाखवून सामावून न घेतलेले किंवा सत्तेच्या पदांवरून दूर केलेल्या बंडखोरांची हे पक्ष वाट बघत आहेत. परंतु, उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक ही नेहमी जात आणि धर्माच्या आधारावर लढविली जाते. टीएमसी आणि ‘आ’ला राज्यात जातींमध्ये आधार नाही तसेच त्यांच्याकडे मतदारांसमोर आणावा असा चेहराही नाही.
 

Web Title: Trinamool to contest assembly elections in five states; Banerjee's policy to harm BJP, Congress pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.