तृणमूलच्या खासदाराची चौकशी
By admin | Published: September 11, 2014 01:41 AM2014-09-11T01:41:24+5:302014-09-11T01:41:24+5:30
कोट्यवधींच्या शारदा चिटफंड घोटाळाप्रकरणी बुधवारी सीबीआयच्या विशेष गुन्हा शाखेने तृणमूल काँग्रेसचे खासदार सृंजय बोस यांची चौकशी केली.
कोलकाता : कोट्यवधींच्या शारदा चिटफंड घोटाळाप्रकरणी बुधवारी सीबीआयच्या विशेष गुन्हा शाखेने तृणमूल काँग्रेसचे खासदार सृंजय बोस यांची चौकशी केली. बोस यांना मंगळवारी न्यायालयाचे समन्स मिळाले होते.
बांगला दैनिक प्रतिदिनचे मालक असलेल्या बोस यांनी तृणमूलचे निलंबित राज्यसभा सदस्य कुणाल घोष यांना या वृत्तपत्राच्या संपादकपदी नियुक्त केले होते. शारदा प्रकरणातील त्यांच्या भूमिकेमुळे घोष अद्याप कारागृहात आहेत. तर प. बंगालचे माजी डीजीपी रजत मुजुमदार हे छातीत दुखत असल्यामुळे कारणाकरिता रुग्णालयात आहेत.
सीबीआयने शारदाप्रकरणी त्यांना मंगळवारी अटक केली होती. त्यांच्या अटकेनंतर लगेचच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. शारदा घोटाळा उघडकीस आल्यानंतर या घोटाळ्याच्या अनेक चूरस कथा आता समोर येऊ लागल्या आहेत. (वृत्तसंस्था)