बाबासाहेबांच्या स्मारकासाठी त्रिपक्षीय करार

By admin | Published: May 1, 2015 01:49 AM2015-05-01T01:49:01+5:302015-05-01T01:49:01+5:30

मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक बांधण्यासाठी इंदू मिलची जागा हस्तांतरित करण्याच्या संदर्भात त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी करण्यात आलेली आहे,

Tripartite agreement for Babasaheb Memorial | बाबासाहेबांच्या स्मारकासाठी त्रिपक्षीय करार

बाबासाहेबांच्या स्मारकासाठी त्रिपक्षीय करार

Next

नवी दिल्ली : मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक बांधण्यासाठी इंदू मिलची जागा हस्तांतरित करण्याच्या संदर्भात केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार आणि राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळ (एनटीसी) यांच्यादरम्यान त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी करण्यात आलेली आहे, अशी माहिती केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री संतोष गंगवार यांनी गुरुवारी लोकसभेत दिली.
चिंतामण वानगा यांनी याबाबत प्रश्न विचारला होता.
बाबासाहेबांच्या या स्मारकासाठी एनटीसीच्या इंदू मिलची १२ एकर जमीन मिळणार आहे. या करारांतर्गत (एमओयू) प्रस्तावित जमिनीचा मोबदला रोख स्वरूपात द्यायचा, पर्यायी जमिनीच्या रूपात द्यायचा की अन्य रूपात हे ठरविण्यासाठी एक उप समिती स्थापन केली जाईल.
तथापि हे स्मारक बांधून केव्हा पूर्ण होईल, हे आताच सांगता येणार नाही, असे गंगवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

गुजरातेत दलितांशी भेदभाव
४गुजरातेत दलितांसोबत भेदभाव केला जात असून, त्यांना मंदिरात प्रवेश करण्यास मज्जाव केला जात असल्याचा आरोप, काँग्रेस सदस्याने राज्यसभेत केला. या मुद्यावरून विरोधक व सत्ताधाऱ्यांत चांगलीच जुंपली. काँग्रेसचे पी.एल. पुनिया यांनी हा मुद्दा उपस्थित केला. गुजरातच्या अनेक गावांत दलितांना मंदिरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

 

Web Title: Tripartite agreement for Babasaheb Memorial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.