ट्रिपल तलाक प्रकरण खंडपीठाकडे, 11 मेपासून सुनावणी

By admin | Published: March 30, 2017 05:10 PM2017-03-30T17:10:43+5:302017-03-30T17:23:04+5:30

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या ट्रिपल तलाक प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टाने आज पाच सदस्यीय खंडपीठाकडे सोपवली

Triple Divorce Case to Hearing, May 11 | ट्रिपल तलाक प्रकरण खंडपीठाकडे, 11 मेपासून सुनावणी

ट्रिपल तलाक प्रकरण खंडपीठाकडे, 11 मेपासून सुनावणी

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या ट्रिपल तलाक प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टाने आज पाच सदस्यीय खंडपीठाकडे सोपवली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश खेहर यांच्या खंडपीठासमोर तिहेरी तलाकप्रकरणी दाखल याचिकांवर सुनावणी झाली. यावेळी त्यांनी हा निर्णय सुनावला.

ट्रिपल तलाक प्रकरणी फक्त कायदेशीर मुद्द्यावरच सुनावणी होईल. सर्व पक्षकारांची बाजू न्यायालय विचारात घेईल. ट्रिपल तलाक, बहुपत्नीत्व आणि निकाह हलाला प्रकरणी येणाऱ्या याचिकांवर खंडपीठाकडे सुनावणी होईल. ही सुनावणी 11 मेपासून घेण्यात येणार असल्याचे सरन्यायाधीश खेहर यांच्या खंडपीठाने सांगितले.

हत्या होण्यापेक्षा, तीन शब्द बरे...
वैयक्तिक कायदे हे घटनेचे उल्लंघन करणारे आहेत असे म्हणून त्यांना आव्हान देता येत नाही. जेव्हा वैवाहिक संबंधांत बेबनाव निर्माण होतो आणि पतीला पत्नीपासून विभक्त व्हावे वाटू लागते, तेव्हा वेळखाऊ न्यायालयीन प्रक्रियेमुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते आणि पती विभक्त होण्यासाठी पत्नीची हत्याही करू शकतो. अशा स्थितीत तलाक या शब्दाचा तीनदा उच्चार करून पत्नीला तलाक देणे हा उत्तम मार्ग आहे, असे या मुस्लिम बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते.

Web Title: Triple Divorce Case to Hearing, May 11

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.