‘तिहेरी तलाक’ आव्हान याचिका फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2018 04:26 AM2018-11-03T04:26:52+5:302018-11-03T04:27:16+5:30
तिहेरी तलाकवर बंदी घालणारा वटहुकूम रद्दबातल ठरवावा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली.
नवी दिल्ली : तिहेरी तलाकवर बंदी घालणारा वटहुकूम रद्दबातल ठरवावा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. सर्वोच्च न्यायालयानेतिहेरी तलाक घटनाबाह्य असल्याचा निकाल दिल्यानंतर केंद्र सरकारने हा वटहुकूम काढला होता.
केरळमधील समस्त केरला जमियात उलेमा या मुस्लिम संघटनेने ही याचिका केली होती. या वटहुकमामुळे राज्यघटनेतील १४, १५ व २१ या कलमांचे उल्लंघन होते आणि ते घटनाबाह्य आहे, असे आक्षेप याचिकेत घेण्यात आले होते. मात्र, केंद्राच्या निर्णयात हस्तक्षेपाचे कारण दिसत नाही, असे सांगून न्यायालयाने ती फेटाळून लावली.
जामिनाची तरतूद
संसदेत त्याचे विधेयक मांडून ते संमत होण्यास वेळ लागणार असल्याने केंद्र सरकारने वटहुकमाचा मार्ग अवलंबला होता. त्याचे केंद्रीय कायदा व न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी त्यावेळी जोरदार समर्थनही केले होते. या वटहुकमात या पद्धतीने तलाक देणाऱ्या पुरुषाला जामीन मिळण्याचीही तरतूद आहे. त्यामुळे खटला सुरू होईपर्यंत त्याला कोठडीत खितपत पडावे लागणार नाही.