ट्रिपल मर्डरने दिल्ली हादरली, आई-वडील आणि मुलीचा चाकूने वार करून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 10:40 AM2024-12-04T10:40:37+5:302024-12-04T10:41:18+5:30
Delhi Crime News: दक्षिण दिल्ली परिसरामध्ये एकाच कुटुंबातील तीन सदस्यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील नेब सराय परिसरात आई-वडील आणि मुलगी अशी तिघांची चाकूने सपासप वार करून हत्या करण्यात आली.
दक्षिण दिल्ली परिसरामध्ये एकाच कुटुंबातील तीन सदस्यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील नेब सराय परिसरात आई-वडील आणि मुलगी अशी तिघांची चाकूने सपासप वार करून हत्या करण्यात आली. प्राथमिक तपासामध्ये मृत दाम्पत्याचा मुलगा हा घराबाहेर असल्याने बचावल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना घडली तेव्हा तो घरात नव्हता. तो फिरण्यासाठी बाहेर गेला होता.
या हत्याकांडाबाबत मिळालेल्या माहितीनुसार मृतांमध्ये ५३ वर्षीय राजेश, ४७ वर्षीय कोमल आणि २३ वर्षीय कविता यांचा समावेश आहे. आई-वडील आणि बहिणीची हत्या झाली तेव्हा आपण फिरायला गेलो होतो, असा दावा त्याने केला आहे.