त्रिपुरात ७६% मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 02:05 AM2018-02-19T02:05:05+5:302018-02-19T03:19:14+5:30
त्रिपुरा विधानसभेच्या निवडणुकांसाठी रविवारी सुमारे ७६ टक्के मतदान झाले. या निवडणुकांत डावे पक्ष सहाव्यांदा सत्तेवर येण्याच्या जिद्दीने उतरले असून, ही मक्तेदारी मोडून काढण्यासाठी त्यांच्याविरोधात भाजप कडवी झुंज देत आहे.
आगरतळा : त्रिपुरा विधानसभेच्या निवडणुकांसाठी रविवारी सुमारे ७६ टक्के मतदान झाले. या निवडणुकांत डावे पक्ष सहाव्यांदा सत्तेवर येण्याच्या जिद्दीने उतरले असून, ही मक्तेदारी मोडून काढण्यासाठी त्यांच्याविरोधात भाजप कडवी झुंज देत आहे.
२०१३ साली झालेल्या त्रिपुरा विधानसभेच्या निवडणुकांत ९३.६ टक्के मतदान झाले होते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत रिंगणात असलेल्या २९२ उमेदवारांपैकी २३ महिला उमेदवार आहेत. काही मतदारसंघात इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्र तसेच व्होटर व्हेरिफिएबल पेपर आॅडिट ट्रेल मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने थोडीशी अडचण निर्माण झाली होती. पण ती दूर करण्यात आली.
माकपचे ५७, भाजपचे ५१, इंडिजिनियस पीपल्स फ्रंट आॅफ त्रिपुराचे ९ तर काँग्रेस सर्व विधानसभा जागा लढवित आहे.
2013
च्या विधानसभा निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्या नेतृत्वाखाली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने विधानसभेच्या ६० पैकी ५० जागा जिंकल्या होत्या. त्रिपुरात भाजपला आजवर विधानसभेत एकही जागा जिंकता आलेली नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने विधानसभेच्या १० जागा जिंकल्या होत्या. २०१३ साली माकपने जिंकल्या होत्या ५० जागा.
त्रिपुरानंतर आता मेघालय व मिझोराममध्ये २७ फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होईल. या तीनही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल ३ मार्चला जाहीर करण्यात येईल.