अधिवेशनादरम्यान सभागृहात पाहिला पॉर्न व्हिडिओ; भाजप आमदारावर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 03:33 PM2023-03-30T15:33:50+5:302023-03-30T15:34:42+5:30

पॉर्न व्हिडिओ पाहताना भाजप आमदार कॅमेऱ्यात कैद झाला. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Tripura BJP MLA Jadab Lal Nath was allegedly caught watching video during the state Assembly session | अधिवेशनादरम्यान सभागृहात पाहिला पॉर्न व्हिडिओ; भाजप आमदारावर आरोप

अधिवेशनादरम्यान सभागृहात पाहिला पॉर्न व्हिडिओ; भाजप आमदारावर आरोप

googlenewsNext


Tripura BJP: काही दिवसांपूर्वीच त्रिपुरा राज्याच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि भारतीय जनता पक्ष (BJP) सत्तेत परतला. कम्युनिस्ट पक्षांचा बालेकिल्ला असलेल्या या राज्यात भाजपने सलग दुसऱ्यांदा सरकार स्थापन केले. यातच आता त्रिपुरामधील एका भाजप आमदाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. विधानसभा अधिवेशन सुरू असताना सभागृहात हा आमदार मोबाईलवर पॉर्न पाहत असल्याचे व्हिडिओत दिसत आहेत. फॅक्ट चेकर मोहम्मद जुबैर यांनी व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.

व्हायरल झालेला व्हिडिओ आज (30 मार्च) त्रिपुरा विधानसभेच्या अधिवेशनादरम्यानचा आहे. त्रिपुराच्या बागबासा विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार जादब लाल नाथ अधिवेशनादरम्यान आपल्या मोबाईलवर पॉर्न पाहताना दिसत आहेत. जादब लाल नाथ मोबाईल फोनवर व्हिडिओ पाहताना कॅमेऱ्यात कैद झाले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जादब लाल नाथ हे बागबासाचे आमदार 
सीपीएमच्या बलाढ्य बालेकिल्ल्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या बागबासा विधानसभा मतदारसंघात जादब लाल नाथ यांनी भाजपच्या विजयाचा झेंडा फडकवला होता. 2018 च्या निवडणुकीत भाजपला बागबासा विधानसभा जागा जिंकता आली नाही. 2018 च्या निवडणुकीत सीपीएमच्या बिजीता नाथ यांनी भाजपच्या प्रदीप कुमार नाथ यांचा 270 मतांनी पराभव केला. 2023 च्या निवडणुकीत भाजपने जादब लाल नाथ यांच्यावर बाजी लावली होती. नाथ यांनी सीपीएमच्या बिजीता नाथ यांचा 1400 पेक्षा जास्त मतांनी पराभव केला. 

Web Title: Tripura BJP MLA Jadab Lal Nath was allegedly caught watching video during the state Assembly session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.