बाबो! महिन्याभरापासून बेपत्ता होता तरुण, घरच्यांना वाटलं मृत्यू; पण श्राद्धाच्या दिवशीच 'तो' परत आला 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 01:05 PM2022-06-08T13:05:24+5:302022-06-08T13:07:05+5:30

गेल्या एक महिन्यापासून बेपत्ता होता. यानंतर पोलिसांनी आकाश सरकारच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून मृतदेह मिळाल्याची माहिती दिली.

tripura dead son returns home during shraddh ceremony | बाबो! महिन्याभरापासून बेपत्ता होता तरुण, घरच्यांना वाटलं मृत्यू; पण श्राद्धाच्या दिवशीच 'तो' परत आला 

बाबो! महिन्याभरापासून बेपत्ता होता तरुण, घरच्यांना वाटलं मृत्यू; पण श्राद्धाच्या दिवशीच 'तो' परत आला 

Next

नवी दिल्ली - त्रिपुरा राज्यातील एक 22 वर्षीय तरुण घरातून अचानक बेपत्ता झाला होता. मात्र, एका महिन्याने तो जेव्हा घरी परतला. यावेळी त्याने जे पाहिले, त्यामुळे त्याला मोठाच धक्काच बसला. तो जेव्हा घरी आला तेव्हा चक्क त्याचं श्राद्ध घातलं जात असल्याची तयारी सुरू असल्याचं त्याला दिसलं आणि तो हादरला. त्रिपुरा जिल्ह्याच्या कालीबाजार परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी एकीकडे तरुणाच्या नातेवाईकांना आनंद होत आहे. तेच दुसरीकडे ते पोलिसांबद्दल रागही व्यक्त करत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, मोहनपूर उपविभागाच्या कालीबाजार येथीर रहिवासी आकाश सरकार मागील एक महिन्यापासून गायब होता. 3 जून रोजी पश्चिम आगरतळा पोलीस स्टेशन अंतर्गत मेलरमठ जवळील तलावात एक मृतदेह तरंगताना आढळला होता. प्राथमिक तपासात मृत कालीबाजार येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. तसेच तो गेल्या एक महिन्यापासून बेपत्ता होता. यानंतर पोलिसांनी आकाश सरकारच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून मृतदेह मिळाल्याची माहिती दिली.

मोहनपूरचे उपविभागीय अधिकारी के. बी. मुजुमदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आकाशचे वडील प्रणव सरकार जीबीपी हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि त्यांची बॅग, पँट आणि टॅब पाहून त्यांनी त्यांच्या मुलाचा मृतदेह ओळखला." शवविच्छेदनानंतर मृतदेह प्रणव सरकार यांच्याकडे सोपवण्यात आला आणि कुटुंबीयांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. "हे चुकीच्या ओळखीचे प्रकरण असल्याने, आम्ही तपास करू आणि जे काही आवश्यक असेल ते करू", असेही पोलीस म्हणाले आहेत.

पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी दबाव टाकल्याचे तरुणाच्या वडिलांचे म्हणणे आहे. तरुणाच्या वडिलांनी सांगितले की, "मी पोलिसांना वारंवार सांगितले की, तलावातून सापडलेला मृतदेह माझ्या बेपत्ता मुलासारखा दिसत नाही. मात्र, पाण्यात बुडल्याने मृतदेह फुगला, असा दावा पोलिसांनी केला. मात्र, पिशवीत सापडलेली टॅबलेट आणि पॅन्ट माझ्या मुलाची आहे, पण तो इतका फिट नाही" असे देखील त्याच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले होते. 

आकाशने दिलेल्या माहितीनुसार, "तो बटाला पुलाजवळ राहत होता आणि नुकताच तो त्याच्या एका बहिणीला भेटायला गेला होता. "आज तिने फोन केला आणि मी घरी परतल्यावर माझे श्राद्ध होत आहे, हे पाहून मला आश्चर्य वाटले" असं सांगितलं. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: tripura dead son returns home during shraddh ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.