त्रिपुरात सरकारी कर्मचाऱ्यालाच ठेचून मारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 05:08 AM2018-06-30T05:08:37+5:302018-06-30T05:08:45+5:30

मुले पळवणा-या टोळीच्या अफवांमुळे शहानिशा न करता कोणालाही मारहाण करण्याचे आणि प्रसंगी ठेचून मारून टाकण्याचे सत्र देशाच्या विविध भागांत सुरू असून

In Tripura, the government employee crushed | त्रिपुरात सरकारी कर्मचाऱ्यालाच ठेचून मारले

त्रिपुरात सरकारी कर्मचाऱ्यालाच ठेचून मारले

Next

आगरतळा : मुले पळवणाºया टोळीच्या अफवांमुळे शहानिशा न करता कोणालाही मारहाण करण्याचे आणि प्रसंगी ठेचून मारून टाकण्याचे सत्र देशाच्या विविध भागांत सुरू असून, त्रिपुरातील आगरतळामध्ये अशाच संशयातून जमावाने एका फेरीवाल्याला बेदम मारहाण केली. त्यात तो मरण पावला आणि तीन जण जखमी झाले.
अफवांमुळे निरपराध लोकांना होणाºया मारहाणीची प्रकरणे वाढत असल्याने संपूर्ण त्रिपुरात एसएमएस व इंटरनेट सेवा २४ तासांसाठी बंद ्रकेल्याचे पोलीस महासंचालक ए. के. शुक्ला यांनी सांगितले.
अफवांवर विश्वास ठेवू नका, असे लोकांना पटवून सांगण्यासाठी सरकारने नेमलेल्या एका कर्मचाºयाचीही जमावाने याच
पद्धतीने ठेचून हत्या केली. सुकांता चक्रवर्ती असे त्याचे नाव असून, तो सरकारच्या माहिती विभागातील अफवाविरोधी मोहिमेचा सदस्य होता. हा कर्मचारी सबरूम येथून परतत असताना,
तोही मुले पळवणाºया टोळीचा भाग असल्याची शंका तेथील रहिवाशांना आली. आपण मुले पळवत नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका, असे सांगण्यासाठी माझी नेमणूक झाली आहे, असे तो जमावातील लोकांना वारंवार सांगत होता. पण त्याचे न ऐकता जमावाने त्याला ठार मारले.
त्याआधी उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमधून रोजगारासाठी आगरतळ्याला आलेल्या झाहीर खान (वय ३०) याला गुरुवारी रात्री जमावान इतके मारले की तोही मरण पावला. तो फेरीवाला आहे. झाहीर
खान गुरुवारी रात्री अन्य तिघांसह कारमधून आगरतळा येथे निघाला होता. त्याच्यासोबतचे तिघे इलेक्ट्रिक वस्तू विकणारे आहेत. (वृत्तसंस्था)

या प्रकारानंतर पोलीस व सरकारी यंत्रणेमार्फत लगेच उपाययोजना करण्याऐवजी राज्य सरकारने याचे खापर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षावर फोडले आहे. आमच्या सरकारला बदनाम करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असे प्रकार करीत आहे, असा आरोप मुख्यमंत्री बिप्लब देव यांनी केला. माकपने याचा लगेचच इन्कार केला. असले हास्यास्पद व न पटणारे आरोप केवळ भाजपाच्या लोकांनाच सुचतात, अशी टीका माकपतर्फे करण्यात आली आहे.

Web Title: In Tripura, the government employee crushed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.