त्रिपुरा : भाजपासोबत एकवटले डाव्यांविरुद्धचे स्थानिक पक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 04:51 AM2019-02-08T04:51:41+5:302019-02-08T04:52:03+5:30

ईशान्येकडील सेव्हन सिस्टर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सात राज्यांमध्ये ठसा उमटविण्याचे भाजपाने नेडा (नॉर्थईस्ट डेमॉक्रेटिक अलायन्स) मार्फत प्रयत्न चालविले आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्टांचा बालेकिल्ला असलेल्या त्रिपुरातही भाजपाने २५ वर्षांनंतर सत्तांतर घडवून आणले.

Tripura: Local parties solidarity with BJP | त्रिपुरा : भाजपासोबत एकवटले डाव्यांविरुद्धचे स्थानिक पक्ष

त्रिपुरा : भाजपासोबत एकवटले डाव्यांविरुद्धचे स्थानिक पक्ष

Next

- ललित झांबरे

ईशान्येकडील सेव्हन सिस्टर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सात राज्यांमध्ये ठसा उमटविण्याचे भाजपाने नेडा (नॉर्थईस्ट डेमॉक्रेटिक अलायन्स) मार्फत प्रयत्न चालविले आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्टांचा बालेकिल्ला असलेल्या त्रिपुरातही भाजपाने २५ वर्षांनंतर सत्तांतर घडवून आणले. गेल्या वर्षी राज्यात झालेल्या विधानसभा, पंचायत पोटनिवडणुका, आगरतळा महापालिका तसेच अन्य नगरपालिका निवडणुकांत भाजपानेच घवघवीत यश मिळवले. त्यामुळे त्रिपुरात सध्यातरी भाजपा यशाच्या लाटेवर आरूढ असल्याचे चित्र आहे.
माणिक सरकार यांच्या जागी मुख्यमंत्रीपदी आलेले भाजपाचे तरुण नेते विप्लबकुमार देव विराजमान झाले आहेत. ते सतत वादग्रस्त विधाने करीत असतात. पण त्यांनी पीपल्स फ्रंट आॅफ त्रिपुराला (आयपीएफटी) सोबत घेतल्याने भाजपाची स्थिती मजबूत झाली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत माकपसाठी दोन्ही जागा कायम राखण्याचे मोठे आव्हान आहे.
विधानसभेत २०१३ साली भाजपाला एकही जागा मिळाली नव्हती. मात्र २०१८ मध्ये ३५ जण निवडून आले. ८ जागा सहयोगी आयपीएफटीनेही जिंकल्या. याप्रकारे ^६० पैकी ४४ जागा जिंकून राज्यात बिगरकम्युनिस्ट सरकार सत्तेवर आले. माकपची ४९ जागांवरून १६ जागांवर घसरण झाली. ही जादू स्वतंत्र त्रिप्रालँड राज्याची मागणी करणाºया आयपीएफटीशी भाजपाने केलेल्या युतीमुळे शक्य झाली. कम्युनिस्टांची दडपशाही व कारवाईमुळे आयपीएफटी नाराज होती. त्यातून त्यांनी आदिवासी पट्ट्यातील ९ पैकी ८ जागा जिंकून ताकद दाखवून दिली. आदिवासी भाग जिल्हा स्वायत्त परिषदेला (टीटीएडीसी) अधिक निधी व योजनांद्वारे बळकट करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे ते एकत्र आले आणि आदिवासी भागांतही भाजपाला ताकद मिळाली.
मार्क्सवादी कम्युनिस्टांनी निवडणुका जिंकण्यासाठी हवा तसा जोरच लावला नाही असा तृणमूल काँग़्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचा आरोप आहे. आहे. काँग्रेसने तृणमूल काँग़्रेसशी युती केल्यास चित्र वेगळे राहील, असे त्यांना वाटते. त्यामुळे आता भाजपाविरोधी सर्व पक्ष एकत्र होण्यावरच लढती किती चुरशीच्या होतात, हे ठरेल. पण ते सर्व एकत्र येतील का, हा प्रश्न आहे.
भाजपाविरोधी पक्षांच्या एकत्र येण्यास सीताराम येचुरी अनुकूल होते, तर प्रकाश करात यांचे मात्र इतरांपासून माकपने वेगळेच राहावे असे धोरण होते. आताही ते तसेच आिहे. मात्र भाजपाने डाव्याविरोधातील घटकांंना एकत्र आणण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांही भाजपा पूर्ण ताकदीनिशी लढण्याच्या तयारीत आहे.

सहा वेळा माकप, आता काय होणार?

त्रिपुरामध्ये साधारण २६ लाखांच्या वर मतदार असून दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी त्रिपुरा(पश्चिम) हा खुला तर त्रिपुरा (पूर्व) हा अनुसूचित जमातीसाठी राखीव मतदारसंघ आहे. या दोन्ही मतदारसंघांमध्ये १९८९ व १९९१ मध्ये काँग़्रेसने विजय मिळविला. त्यानंतर १९९६, १९९८, १९९९, २००४, २००९ आणि २०१४ अशा सलग सहा लोकसभा निवडणुकांमध्ये माकपने यश मिळवले. या लोकसभा निवडणुकांत मार्क्सवादी उमेदवाराचा विजय आणि काँग्रेस दुसºया स्थानी असेच चित्र असायचे. या मतदारसंघातून अनुक्रमे शंकर प्रसाद दत्ता व जितेंद्र चौधरी हे दोघे खासदार आहेत.
 

Web Title: Tripura: Local parties solidarity with BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.