पार्टीत दारू समजून प्यायले अ‍ॅसिड , 3 जणांचा मृत्यू; त्रिपुरातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 11:03 AM2021-12-30T11:03:31+5:302021-12-30T11:07:38+5:30

दारुच्या नशेत असलेल्या तिघांनी दारू समजून अॅसिडचे सेवन केले, यानंतर त्यांची तब्येत बिघडली.

Tripura News| 3 people died after consuming acid by mistaking it for alcohol | पार्टीत दारू समजून प्यायले अ‍ॅसिड , 3 जणांचा मृत्यू; त्रिपुरातील धक्कादायक घटना

पार्टीत दारू समजून प्यायले अ‍ॅसिड , 3 जणांचा मृत्यू; त्रिपुरातील धक्कादायक घटना

googlenewsNext

धलाई: तुम्ही अनेकदा बनावट दारू पिल्यामुळे मृत्यू झाल्याच्या बातम्या पाहिल्या असतील. पण, त्रिपुरामध्ये दारू समजून अ‍ॅसिड पिल्याची घटना घडली आहे. अ‍ॅसिड पिल्यामुळे 3 जणांचा मृत्यू झाला आहे. घटना त्रिपुरातील धलाई जिल्ह्यात घडली. त्रिपुरा पोलिसांनी सांगिल्यानुसार, सोमवार(27 डिसेंबर)एका पार्टीत तीन मद्यधुंद व्यक्तींनी दारुऐवजी चुकून अ‍ॅसिड प्यायले, ज्यात त्यांचा मृत्यू झाला. 

पोलीस अधिकारी रत्न साधन जमातिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा जय पारा येथील सचिंद्र रेआंग (22),हजरधन पारा येथील अधीराम रेआंग (40) आणि नेपाळटीला भागातील भाबीराम रेआंग अशी मृतांची नावे आहेत. सोमवारी एका पार्टीदरम्यान तिघांनी चुकून अ‍ॅसिड पिले. अ‍ॅसिड पिण्याआधी तिघेही आधीच दारुच्या नशेत होते. 

पोलिसांनी सांगितल्यानुसार, सोमवारी रात्री एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पार्टीत तीन मृतांसह 10 लोक सहभागी झाले होते. पार्टीत जास्त दारू प्यायल्यानंतर तिघांनी चुकून अ‍ॅसिड प्यायले. ते दारुच्या नशेत असल्याने दारू आणि अ‍ॅसिडमधील फरक समजू शकले नाही. घटनेनंतर लगेचच तिघांना प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, तेथून बुधवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात रेफर केले. पण, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

Web Title: Tripura News| 3 people died after consuming acid by mistaking it for alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.