त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांना मारणा-यास बक्षीस, फेसबुकवरील फतवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 01:11 AM2017-08-19T01:11:26+5:302017-08-19T01:11:27+5:30
त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांना जिवे मारणाºयास ५.५ लाख रुपये देण्यात येतील, अशा आशयाचा एक फतवा फेसबुकवर पोस्ट करण्यात आला
आगरतळा : त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांना जिवे मारणा-यास ५.५ लाख रुपये देण्यात येतील, अशा आशयाचा एक फतवा फेसबुकवर पोस्ट करण्यात आला आहे. या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार कारवाई सुरु असल्याचे त्रिपुराचे पोलीस प्रमुख अभिजीत सप्तर्षी यांनी सांगितले.
फतवा पोस्ट करणा-या व्यक्तीचा शोध लावण्यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घेण्यात येणार आहे. अशा प्रकरणात काही वेळ लागतो. तरीही या आरोपीला आम्ही निश्चित शोधू असा विश्वासही पोलीस प्रमुखांनी व्यक्त केला. ही पोस्ट हटविण्यात आली आहे. फतवा जारी करणाºया व्यक्तीने एका मुलीच्या फोटोसह रिया रॉय नावाचा उपयोग केला आहे. त्याने स्वत: वर्ल्ड अँटीकम्युनिस्ट काउन्सिलचा सदस्य असल्याचे नमूद केले आहे.