ॲट्रोसिटी ॲक्ट -- जोड २
By admin | Published: September 10, 2015 04:46 PM2015-09-10T16:46:28+5:302015-09-10T16:46:28+5:30
सिरसपेठ येथील असित विजय लिहितकर याच्या तक्रारीवरून सक्करदरा पोलिसांनी २७ मार्च २०१४ रोजी सतीश बाबूराव मते आणि तिघांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल केला. असितने आरोपींसोबत धामना येथील शेतीचा सौदा केला होता. पुढे असितने त्याच्या वाट्याला आलेल्या जमिनीचा सौदा २०१० मध्ये ताजबाग येथील सय्यद सलीमसोबत १० लाखात केला होता. हे पैसे आम्हाला दिले नाही तर तुझा खून करू, अशी धमकी देऊन आरोपींनी त्याला जातीवाचक शिवीगाळ केली होती. उच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या तपासास स्थगिती दिली आहे.
Next
स रसपेठ येथील असित विजय लिहितकर याच्या तक्रारीवरून सक्करदरा पोलिसांनी २७ मार्च २०१४ रोजी सतीश बाबूराव मते आणि तिघांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल केला. असितने आरोपींसोबत धामना येथील शेतीचा सौदा केला होता. पुढे असितने त्याच्या वाट्याला आलेल्या जमिनीचा सौदा २०१० मध्ये ताजबाग येथील सय्यद सलीमसोबत १० लाखात केला होता. हे पैसे आम्हाला दिले नाही तर तुझा खून करू, अशी धमकी देऊन आरोपींनी त्याला जातीवाचक शिवीगाळ केली होती. उच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या तपासास स्थगिती दिली आहे. नरेंद्रनगर येथील अतुल अशोक वंजारी यांच्या तक्रारीवरून ८ एप्रिल २०१४ रोजी दिवाकर पाटणे आणि सुभाष सिंगविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. अतुलने आरोपींच्या रिसॉर्टवर घरगुती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या ठिकाणी पैशाच्या देवाणघेवाणवरून भांडण होऊन आरोपींनी अतुलला जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित केले होते. याही प्रकरणाच्या तपासाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. विजयानंद सोसायटी येथील प्रतिभा वैरागडे यांच्याविरुद्ध त्यांचीच मोलकरीण छाया मेश्राम रा. जातटरोडी यांनी तक्रार दाखल केल्यावरून धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. छायाला भांडी धुण्याच्या कारणावरून वैरागडे यांनी जातीवाचक शिव्या देऊन अपमानित केले होते. वैरागडे यांनी उच्च न्यायालयात एफआयआर रद्दसाठी याचिका दाखल केलेली नाही. न्यायालयाने त्यांची विनंती मान्य केली आहे. परंतु अद्याप आदेश दिलेला नाही. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २४ जुलै २०१४ रोजी उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी ईश्वर अरसपुरे यांनी एका अनुसूचित जातीच्या मुलीचा हात पकडून विनयभंग केला होता. या अधिकाऱ्याविरुद्ध ॲट्रोसिटी ॲक्ट आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. उच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या तपासावर स्थगनादेश दिला होता. अपूर्ण ---