घारापुरी बेटाला समस्यांचा विळखा
By Admin | Published: December 20, 2014 10:27 PM2014-12-20T22:27:23+5:302014-12-20T22:27:23+5:30
मधुकर ठाकूर : उरण - जगभरात घारापुरी बेटावरील लेण्या प्रसिद्ध असल्या तरी रहिवाशांना भेडसावणार्या अनेक समस्यांमुळे मात्र बेट कायम दुर्लक्षित राहिले आहे. वीज, पाणी, आरोग्य आणि इतर समस्या सोडविण्याकडे स्थानिक प्र्रतिनिधींपासून आमदार, खासदार आणि प्रामुख्याने केंद्र, राज्य सरकारकडूनही अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने रहिवाशांच्या समस्या सुटण्याऐवजी आणखीनच जटील बनत आहेत.
म ुकर ठाकूर : उरण - जगभरात घारापुरी बेटावरील लेण्या प्रसिद्ध असल्या तरी रहिवाशांना भेडसावणार्या अनेक समस्यांमुळे मात्र बेट कायम दुर्लक्षित राहिले आहे. वीज, पाणी, आरोग्य आणि इतर समस्या सोडविण्याकडे स्थानिक प्र्रतिनिधींपासून आमदार, खासदार आणि प्रामुख्याने केंद्र, राज्य सरकारकडूनही अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने रहिवाशांच्या समस्या सुटण्याऐवजी आणखीनच जटील बनत आहेत. रायगड जिल्ह्याच्या अखत्यारित असलेल्या दुर्लक्षित बेटाकडे विकासाची बोंब आहे. बेटावरील रहिवासी कायमस्वरूपी विजेअभावी अद्यापही अंधारातच चाचपडत आहेत. पर्यटक आणि बेटावरील तिन्ही गावातील रहिवाशांची पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी धरण बांधले. मात्र धरणात पावसाळ्याव्यतिरिक्त पाणीच शिल्लक राहत नाही. धरण दुरुस्तीसाठी चार कोटी खर्च झाले मात्र नियोजनाअभावी हा निधी पाण्यात गेला. राजबंदर जेीच्या लेण्यांकडे जाणारा ४० वर्षापूर्वी बांधलेला सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याची दयनीय अवस्था असून या रस्त्याला मोठमोठे तडे गेले आहेत. तर दुरुस्तीअभावी रस्त्यांचे कठडे ढासळले आहेत. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून रस्ते झाले. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे साडेचार कोटी खर्चाचे काम निरुपयोगी ठरले . जेएनपीटी बंदराच्या उभारणीमुळे विकासाच्या नावाखाली होत असलेल्या दगड मातीच्या भरावामुळे किनारपट्टीची धूप झाली आहे. घारापुरी बेटवासियांना लागलेले समस्यांचे ग्रहण सुटावे, अशी रहिवाशांची इच्छा आहे. त्यासाठी केंद्र, राज्य सरकारकडे आमदार खासदारांनी संयुक्तपणे प्रयत्न करावेत अशी मागणी शिवसेनेचे घारापुरी ग्रा. पं. सदस्य तथा उपविभाग प्रमुख बळीराम ठाकूर यांनी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे आणि मनोहर भोईर यांना निवेदनाद्वारे केली आहे. येथील महिला बचत गट, आर्थिक सदृढ बनविण्यासाठी योजना राबविण्यात याव्यात आणि पर्यटकांसाठी आणि त्यावर आधारी लघुउद्योगांसाठी मरीन मेरीटाईम बोर्ड, एमएमआरडीए, जेएनपीटी, ओएनजीसी यांच्याकडून शासनाच्या माध्यमातून बेटांच्या विकास कामांसाठी निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही ठाकूर यांनी केले आहे.-----------------चौकटपायाभूत सुविधांचा विकास आवश्यकन्हावा शेवा समुद्रामार्गे येणार्या मोरावासियांसाठी जेी बांधणे, तिन्ही गावात ड्रेनेजची व्यवस्था करणे, सागरी धूप संरक्षक कठडे बांधणे, राजबंदर येथे पर्यटकांसाठी शौचालय , व्यायाम शाळा, समाजमंदिर, बेटावरील बेरोजगारांसाठी परिसरातील विविध कंपन्या, प्रकल्पात प्राधान्य आदी पायाभूत सुविधांचा विकास करणे आवश्यक आहे. ------१) घारापुरी बेटावर प्राचीन, अद्भुत, अप्रतिम कोरीव लेण्या आहेत. काळ्या पाषाणातील कोरीव लेण्यांमुळे घारापुरी लेण्यांचा वर्ल्ड हेरिटेजमध्ये समावेश २) दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक या ठिकाणी भेट देतात. पर्यटक ांमुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला असला, तरी उत्पन्न फारच कमी आहे. ३) त्यामुळे बेटावरील राजबंदर, शेतबंदर, मोराबंदर या तिन्ही गावातील रहिवाशांना विशेषत: युवकांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे.----------