TRAI Update : मोबाइल कॉलवर आययूसी चार्जेस लावण्याबाबत ट्रायचा लवकरच निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 01:57 AM2019-11-20T01:57:11+5:302019-11-20T01:57:25+5:30
TRAI Update : जिओ वगळता अन्य सर्व टेलिकॉम कंपन्यांचा रद्द करण्याचा आग्रह
नवी दिल्ली : मोबाइल कंपन्यांमध्ये इंटरकनेक्ट युसेज चार्जेसमुळे (आययूसी) सुरू असलेल्या वादावर ट्राय (दूरसंचार नियामक प्राधिकरण) याच महिन्याच्या अखेरीस निर्णय घेणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. एका नेटवर्कवरून दुसºया कंपनीच्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी आययूसी आकारले जाते.
जिओहून वेगळ्या म्हणजेच अन्य कंपनीच्या फोनवर कॉल केल्यास त्यासाठी इंटरकनेक्ट युजेस चार्जेस द्यावे लागतील, असे मध्यंतरी जिओने जाहीर केले. त्यासाठी जिओच्या ग्राहकांना पॉप अप चार्जेस भरा, असे संदेश सतत येत आहेत. त्या बदल्यात जिओने अधिक डेटा ग्राहकांना देऊ केला. याप्रकारे आययूसी चार्जेस घेता येतात का, हा वाद कंपन्यांत सुरू आहे.
खरे तर ट्रायने यावर्षीच्या जानेवारीतच आययूसी रद्द करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यास मुदतवाढ द्यावी का, या मुद्द्यावर सर्व टेलिकॉम कंपन्यांचे म्हणणे मागवून घेतले होते. गेल्या आठवड्यात ट्रायने सर्व टेलिकॉम कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊ न त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर आययूसी चार्जेसबाबत लवकरच निर्णय घेण्याचे ट्रायने स्पष्ट केले आहे.
...तर व्हॉइस कॉल बंद करू
आययूसी चार्जेस रद्द करण्याच्या निर्णयास मुदतवाढ देऊ नये, असा जिओचा आग्रह आहे. तसे केल्यास मोफत व्हॉइस कॉलची सेवाच बंद करावी लागेल व दरवाढही करावी लागेल, असे जिओला वाटते. आययूसी बंदच केल्यास ग्राहकांच्या खर्चात वाढ होईल, असे मुकेश अंबानी यांनी म्हटले. मात्र, अन्य कंपन्यांनी आययूसी चार्जेस असता कामा नयेत, अशीच भूमिका घेतली आहे.