प्रवासी मजुरांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला ट्रकची धडक, 24 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 07:35 AM2020-05-16T07:35:38+5:302020-05-16T09:36:57+5:30

जखमींना जिल्हा रुग्णालयात आणि सैफई पीजीआय येथे पाठविण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन घटनास्थळी उपस्थित पोहोचले आहे.

A truck carrying migrant workers collided with a truck, killing 23 people vrd | प्रवासी मजुरांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला ट्रकची धडक, 24 जणांचा मृत्यू

प्रवासी मजुरांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला ट्रकची धडक, 24 जणांचा मृत्यू

Next

लखनऊः उत्तर प्रदेशमधील औरैया जिल्ह्यात एका ट्रकने प्रवासी मजुरांनी भरलेल्या डीसीएमला धडक दिल्यानं भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 24 मजूर ठार झाले आहेत. तसेच 15 लोक जखमी आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात आणि सैफई पीजीआय येथे पाठविण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन घटनास्थळी पोहोचले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका ट्रकने कामगारांना घेऊन जाणा-या डीसीएमला धडक दिली, अपघातात 24 लोक ठार, तर 15 जण जखमी झाले. सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ट्रकने धडक दिली, तेव्हा डीसीएम रस्त्यावर उभा होता. औरैया, एसपी सुनिती सिंह आणि अनेक पोलीस ठाण्यांचे पोलीस घटनास्थळी उपस्थित आहेत. पोलीस मदत व बचावकार्यात व्यस्त आहेत. गंभीर जखमी झालेल्यांना कानपूरच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले आहे. घटनेचा विचार करता मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

या प्रकरणाची माहिती मिळताच प्रशासकीय कर्मचारीही जागरूक झाले आहेत. तातडीने पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य आणि मदतकार्य सुरू केले. या अपघातात 24 जणांचा मृत्यू झाल्याचे ओरैया सीएमओ अर्चना श्रीवास्तव यांनी सांगितले. 22 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून, गंभीर जखमींपैकी 15 जणांना सेफाई पीजीआय येथे दाखल करण्यात आले आहे. ते सर्व मजूर राजस्थानहून बिहार-झारखंडला जात होते. 

अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक
या घटनेनंतर समोर आलेल्या चित्रात मजुरांच्या मालाचा ढीगदेखील पाहायला मिळतो आहे. एसपी औरैया यांच्याशी घटनेविषयी सांगितले की, ही घटना पहाटे 3 ते 4 दरम्यान घडल्याचे घडली. बचावकार्य सध्या सुरू आहे. जखमींपैकी काही जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, ज्यांची प्रकृती गंभीर असून, त्यांना सैफईसाठी हलवण्यात आलं आहे. या घटनेनंतर डीएम औरैया अभिषेक सिंह यांनी म्हटले आहे की, यातील बहुतेक लोक बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमधील होते.

सीएम योगी यांनी घटनेची घेतली दखल
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी औरैया येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेची दखल घेतली आहे. या अपघातात प्राण गमावलेल्या कामगारांबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं आहे. अतिरिक्त मुख्य सचिव गृह अवनीश कुमार अवस्थी यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री योगी यांनी पीडितांना सर्वतोपरी दिलासा देण्याचे तसेच सर्व जखमींना योग्य उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी मंडलयुक्त कानपूर आणि आयजी कानपूर यांना तातडीने घटनास्थळी पोहोचण्यासाठी आणि त्यांच्या देखरेखीखाली मदतकार्य करण्याचे, अपघाताचे कारण तपासून माहिती देण्याची सूचना केली आहे.

Web Title: A truck carrying migrant workers collided with a truck, killing 23 people vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.