कर्नाटकमध्ये ट्रकशी टक्कर; मिनीबसमधील १३ प्रवासी ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2021 05:50 AM2021-01-16T05:50:52+5:302021-01-16T05:50:59+5:30
या अपघातातील जखमींना केआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. दावणगिरी येथील रहिवासी असलेले प्रवासी एका समारंभासाठी गोवा येथे चालले होते.
धारवाड : कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यात इट्टीगट्टी या ठिकाणानजीक शुक्रवारी सकाळी ट्रकशी झालेल्या धडकेत एका मिनीबसमधील प्रवाशांपैकी १३ जण ठार झाले. त्यामध्ये बहुतांश महिला प्रवासी आहेत. या भीषण अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला
आहे.
या अपघातातील जखमींना केआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. दावणगिरी येथील रहिवासी असलेले प्रवासी एका समारंभासाठी गोवा येथे चालले होते. पोलीस अधीक्षक कृष्णकांत यांनी सांगितले की, अपघाताचे वृत्त कळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. या अपघातप्रकरणी पोलिसांनी धारवाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला
आहे. धारवाडमधील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त करून म्हटले आहे की, अपघातातील जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होईल, अशी सदिच्छाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे.