ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी महामार्गावर घडला अपघात : जीप चालकाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2016 01:00 AM2016-02-07T01:00:39+5:302016-02-07T01:00:39+5:30
फोटो
Next
फ टोजळगाव: राष्ट्रीय महामार्गावर ओव्हरटेक करणार्या ट्रक व जीपचा धक्का लागल्याने रवींद्र हरिचंद्र पाटील (वय ४८ रा.अयोध्या नगर) व कल्पना अशोक भोळे (रा.कोल्हे नगर) हे दुचाकीवरील दोनजण जखमी झाले. हा अपघात शनिवारी दुपारी पावणे दोन वाजता शिव कॉलनी उड्डाणपुलावर झाला. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी जीप चालकाला नागरिकांनी बेदम मारहाण केली.रवींद्र पाटील व कल्पना भोळे हे दोघेजण दुचाकीने (क्र.एम.एच.१९ सी.बी.११४७) महामार्गावरुन जात असताना नाशिकहून खंडव्याला जाणारी विना क्रमांकाच्या जीपचा दुचाकीला धक्का लागला. त्याच वेळी समोरुन येणार्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात पाटील व भोळे हे जखमी झाले तर त्यांच्या दुचाकीचे प्रचंड नुकसान झाले. अपघात झाल्याचे लक्षात येताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, तितक्यात ट्रक चालक हा तेथून पसार झाला. तर जागेवर असलेला जीप चालक संजय देवराम भामरे (वय ५५ रा.भिलकोट, ता.मालेगाव) याला जमावाने जबर मारहाण केली. रामानंद नगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून जीप चालकाला ताब्यात घेतले. जखमींना लोकांनीची खासगी रुग्णालयात दाखल केले.अपघात प्रकरणात ताब्यात घेतलेली जीप ही नाशिक येथील कंपनीतून खंडवा येथे पोहच करण्यासाठी जात होती. चालक संजय भामरे याच्याविरुध्द रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पादचारी महिलेला दुचाकीची धडकरस्त्याने पायी चालणार्या सुशाबाई कौतिक महाजन (रा.तुकारामवाडी) या महिलेला शनिवारी संध्याकाळी साडे पाच वाजता नवीन बसस्थानकाजवळील चिमुकले राम मंदिरासमोर स्वातंत्र्य चौकाकडून येणार्या दुचाकीने (क्र.एम.एच.१९ बी.एल.७०४४) जोरदार धडक दिली. यावेळी ड्युटीवर असलेले वाहतूक शाखेचे सहायक फौजदार विलास पाटील व कॉन्स्टेबल सुनील फेगडे यांनी जखमी महिलेला एका रिक्षातून खासगी दवाखान्यात पाठविले. दुचाकीस्वार प्रणव सोपान पवार (रा.दांडेकर नगर) याला दुचाकीसह ताब्यात घेतले.