मानवतेचा खरा विकास साहित्यातून होत असतो

By Admin | Published: January 23, 2017 08:13 PM2017-01-23T20:13:03+5:302017-01-23T20:13:03+5:30

* चंद्रकुमार नलगे : कुद्रेमनी येथे ११ वे साहित्य संमेलन

The true development of humanity takes place through literature | मानवतेचा खरा विकास साहित्यातून होत असतो

मानवतेचा खरा विकास साहित्यातून होत असतो

googlenewsNext
*
ंद्रकुमार नलगे : कुद्रेमनी येथे ११ वे साहित्य संमेलन
* कुद्रेमनी (ता. बेळगाव) येथील साहित्य संमेलनात बोलताना प्रा. चंद्रकुमार नलगे.
क्रमांक : २२०१२०१७-गड-०८
चंदगड : प्रलंबित असलेला सीमाप्रश्न महाराष्ट्र व कर्नाटक सरकारने सामंजस्याने विचार करून सोडवायला हवे. सीमेवरच्या लढाईत मराठी माणसांनाच अत्याचार सहन करावा लागला आहे. ९ व्या शतकापासून संपूर्ण कर्नाटकात मराठीचा जागर घुमतोय. त्यामुळे संकुचितवृत्तीने मराठी भाषेला विरोध करणे चुकीचे आहे. लोकजागर, प्रबोधन, समाज बदलण्यासाठी साहित्य संमेलन व्हावीत. नवसमाज निर्मिती व मानवता जिवंत ठेवायची असेल तर साहित्याचा विकास झाला पाहिजे, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष प्रा. चंद्रकमार नलगे यांनी केले.
कुद्रेमनी (ता. बेळगाव) येथे बलभीम साहित्य संघ आयोजित ११ व्या साहित्य संमेलनात बोलत होते.
प्रास्ताविक महादेव गुरव यांनी करून साहित्य चळवळीतूनच मराठीचा जागर करणे व मराठी भाषिकांमध्ये एकजूट ठेवणे हाच या संमेलनाचा उद्देश आहे.
नलगे म्हणाले, त्यागावर आधारलेली भारतीय संस्कृती आहे. पण, स्वैराचार वाढलेल्या युगात सृजनशील संस्कृतीलाच धोका निर्माण झाला आहे. माता व मातीचे ऋण मोठं आहे. ते जपण्याचे काम आजच्या साहित्यकांनी केले पाहिजे, असे सांगून मराठी मुलांना मातृभाषेतूनच शिक्षण मिळालं पाहिजे. यासाठी कर्नाटक सरकारने मोठं मन दाखवायला हवं.
संमेलनाच्या उद्घाटक जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील यांनी विचारांची देवाण-घेवाण होण्यासाठी साहित्य संमेलने ही सीमाभागातील चळवळ बनली पाहिजे, असे मत व्यक्त करून सीमाभागातील मराठी भाषा आणि भाषिक यांना या साहित्य संमेलनातून बळ मिळत असल्याचे सांगितले.
प्रारंभी सकाळी गावातून गं्रथदिंडी काढण्यात आली. दुसर्‍या सत्रात प्रा. राजू पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कवीसंमेलनात लता ऐहोळे, अनिल दीक्षित, पूजा भंडांगे यांनी कविता सादर केल्या. त्यानंतर मराठी संत साहित्यातील सामाजिक विचार या विषयावर प्रा. शिवाजीराव भुकेले यांचे व्याख्यान झाले. तिसर्‍या सत्रात मारुती कंगोरे यांनी कथाकथन सादर केले.
यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर, आर. आय. पाटील, एन. बी. खांडेकर, माधुरी हेगडे, अशिता सुतार, आर. के. सुतार, शामला मारुती पाटील, अर्जून जांबोटकर, रघुनाथ गुडेकर, दीपक दळवी, डॉ. विजय क˜ीमणी, डॉ. व्ही. एस. सातेरी, प्रा. एम. बी. मापटे, प्रा. राजेश घोरपडे, माजी नगराध्यक्ष विजय पाटील, रामचंद्र पाटील, पी. डी. कांबळे, महंेद्र पाटील आदीसह चंदगड, खानापूर, बेळगावमधील साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. वंदना गुरव यांनी स्वागत केले. जी. जी. पाटील व शिवाजी शिंदे यांनी सूत्रसंचलन केले. अमित मोहिते यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
चौकट
* १९८१ मध्ये दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा स्थापन करण्याला तत्कालीन प्रस्तावित साहित्यकराकडून प्रचंड विरोध झाला. यावेळी तत्कालीन उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांनी मदत केल्यामुळे ग्रामीण भागात साहित्य संमेलने होऊ लागल्याचे प्रा. चंद्रकुमार नलगे यांनी सांगितले.
* १९८२ मध्ये बेळगाव येथे दक्षिण महाराष्ट्र साहित्य संस्थेतर्फे बेळगाव येथील साहित्य संमेलनाला परवानगी नाकारली होती. भाई दाजिबा देसाई यांच्यामुळेच ते संमेलन ज्योती कॉलेजमध्ये होऊ शकले, याची आठवणही नलगेंनी यावेळी करून दिली.

Web Title: The true development of humanity takes place through literature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.