खरा तो एकची धर्म... श्रीमद्भगवद्गीतेचं उर्दूत भाषांतर, फातिमाने सांगितली समानता
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 04:52 PM2022-11-23T16:52:45+5:302022-11-23T16:57:47+5:30
तेलंगणातील एका मुस्लीम महिनेनं हिंदु धर्मीयांचा सर्वात पवित्र ग्रंथ असलेल्या भगवद्गीताचे उर्दूच भाषांतर केलं आहे.
हैदराबाद - सर्वधर्म समभाव जपणारा देश म्हणजे भारत होय. म्हणून, सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्ता हमारा, हम बुलबुले है इसकी, ए गुलिस्ता हमारा, असं प्रत्येक भारतीय अभिमानानं म्हणतो. येथे हिंदु, मुस्लीम, शीख, ईसाई या धर्मांसह सर्वच जाती-धर्माचे लोकं गुण्यागोविंदाने नांदतात. भारतीय संविधानही येथील नागरिकांना धर्म स्वातंत्र्याचा अधिकार देतो. त्यामुळे, हिंदुंच्या सणात मुस्लीम बांधव दिवाळी साजरी करतात. तर, रमजान ईदला शुरकुर्मा पिण्यासाठी हिंदू बांधवही आतुर असतात. अशाच प्रकरचं धार्मिक सद्भभावना जपणारं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे.
तेलंगणातील एका मुस्लीम महिनेनं हिंदु धर्मीयांचा सर्वात पवित्र ग्रंथ असलेल्या भगवद्गीताचे उर्दूच भाषांतर केलं आहे. निजामाबाद जिल्ह्यातील बोधन शहरातील राकासी पेठ परिसरातील मूळ निवासी असलेल्या हेबा फातिमा यांनी एक सरळ भाषेत ''भगवद् गीता और कुरान के बीच समानता'' असे पुस्तक लिहिले आहे. त्यामुळे, सर्वच धर्मीयांकडून तिचं कौतुक होत आहे.
फातिमा ही एम ए इंग्रजी विषयाची विद्यार्थींनी आहे. त्यांनी उर्दू माध्यमातून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर, इंग्रजी विषयात पदवीचं शिक्षण घेतलं. फातिमाचे वडिल परिसरातच एक छोटे व्यापारी आहेत. इतर धर्मांचे ज्ञान घ्यावे, यासाठी फातिमाने भगवद् गीतेचा अभ्यास केला. या दरम्यान, तिने भगवद् गीतेच्या १८ अध्यायातील एकूण ७०० श्लोक उर्दूत भाषांतरीत केले. काही शब्दांचा स्पष्ट आणि मूळ अर्थ जाणून घेण्यासाठी तिला मोठे परिश्रमही घ्यावे लागले. तर, भगवद् गीतामधील ५०० श्लोक आणि कुरानमधील ५०० छंदांचा एकच अर्थ असल्याचे फातिमा यांनी सीएनएन न्यूज १८ शी बोलताना सांगितले. भगवद् गीतेच उर्दू भाषेत अनुवाद म्हणजेच भाषांतर केलं आहे. विशेष म्हणजे फातिमा ‘मैसेज फॉर ऑल बाय हेबा फातिमा’ नावाने युट्यूब चॅनेल चालवत असून यात उर्दूमध्ये भगवद् गीतेचा अर्थ ती समजावून सांगते. या चॅनेवर आत्तापर्यंत १०० व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत.