चेन्नईकरांच्या जिभेवर ‘ट्रम्प दोसा’ची चव

By admin | Published: November 18, 2016 01:13 AM2016-11-18T01:13:12+5:302016-11-18T01:13:12+5:30

डोनाल्ड ट्रम्प यांचे चाहते काही फक्त अमेरिकेतच नाहीत, तर भारतातही ट्रम्प समर्थक दिसून येत आहेत.

Trump Dosa's taste on Chennai's ji | चेन्नईकरांच्या जिभेवर ‘ट्रम्प दोसा’ची चव

चेन्नईकरांच्या जिभेवर ‘ट्रम्प दोसा’ची चव

Next

चेन्नई : अमेरिकेतील निवडणुकीत रिपब्लिकनचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले आणि राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. अर्थात, डोनाल्ड ट्रम्प यांचे चाहते काही फक्त अमेरिकेतच नाहीत, तर भारतातही ट्रम्प समर्थक दिसून येत आहेत. आता हेच पाहा ना, तामिळनाडूतील रामापूरमच्या एका रेस्टॉरंट मालकाने ट्रम्प यांच्या विजयामुळे उत्साहित होऊन चक्क ‘ट्रम्प दोसा’च सुरू केला आहे. सध्या हा चर्चेचा विषय आहे.
रामपूरमजवळच्या वल्लुवर सलाई येथील रेस्टॉरंटचे मालक सी.पी. मुकुंद दास हे ट्रम्प यांचे चाहते आहेत. ट्रम्प विजयी झाल्यामुळे त्यांनी आता ट्रम्प यांच्या सन्मानार्थ ‘व्हाईट दोसा’ हा नवा मेन्यू सादर केला आहे. केळीच्या पानावर गरम गरम दोसा, सोबत सांबर, चटणी, लोणी आणि चवीला आणखीही बरंच काही. कुणाच्या तोंडाला पाणी सुटले नाही तरच नवल. या दोशाची किंमत आहे ५० रुपये. रेस्टॉरंटचे मालक सी.पी. मुकुंद दास म्हणतात की, मी ट्रम्प यांचा चाहता आहे. ट्रम्प जिंकावे असे मला नेहमीच वाटायचे. मी तर असे ठरविलेही होते की, ट्रम्प जिंकले तर त्यांच्या नावाने एखादा उपक्रम सुरू करीन.
दास यांनी रेस्टॉरंटच्या समोरील भागातच ‘ट्रम्प स्पेशल’ असा फलकही लावला आहे. या उत्सुकतेतून अनेक जण रेस्टॉरंटला भेट देत आहेत. येथील मार्केटिंग मॅनेजर विपिन पुरुषोत्तम यांनी सांगितले की, दिवसभरात १३० दोशांची येथे मागणी आहे. शहरातील हे जुने हॉटेल असून,त्याच्या सहा शाखा आहेत. काही हितचिंतकांनी ‘ट्रम्प दोसा’ या नावावर आक्षेप घेत हा मुद्दा वादग्रस्त होऊ शकतो, असे सांगितले; पण दास हे आपल्या निर्णयावर ठाम होते. (वृत्तसंस्था)

Web Title: Trump Dosa's taste on Chennai's ji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.