Trump Investment in India: डोनाल्ड ट्रम्प यांची भारतील 'या' चार शहरांमध्ये मोठी गुंतवणूक; जाणून घ्या इन्वेस्टमेंट प्लान...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 03:48 PM2022-12-15T15:48:58+5:302022-12-15T16:03:48+5:30
Trump Investment: द ट्रम्प आर्गनायझेशनने भारतातील एक मोठ्या कंपनीसोबत करार केला आहे.
Trump Investment Plan in India: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) भारतात मोठी गुंतवणूक करणार आहेत. ट्रम्प यांची रिअल इस्टेट कंपनी ट्रम्प ऑर्गनायझेशन (The Trump Organisation) भारतातील अनेक शहरांमध्ये लक्झरी रेजिडेंशिअल प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. ट्रम्प यांची कंपनी भारतात एकूण 3 ते 5 निवासी प्रकल्पांवर काम करण्याचा विचार करत आहे. लुधियाना, हैदराबाद, बंगळुरू आणि चंदीगड यांसारख्या देशातील मोठ्या शहरांमध्ये ट्रम्प यांची कंपनी हा प्रकल्प सुरू करण्याचा विचारात आहे.
ट्रम्प यांच्या कंपनीसोबत करार
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ट्रम्प ऑर्गनायझेशनने(The Trump Organisation) भारतात निवासी मालमत्ता बनवण्यासाठी एका भारतीय कंपनीशी करार केला आहे. ट्रायबेका डेव्हलपर्स असे या कंपनीचे नाव आहे. ही एक दिल्ली स्थित कंपनी असून, 10 वर्षांपासून या क्षेत्रात काम करत आहे. ट्रम्प यांच्या कंपनीने ट्रायबेका डेव्हलपर्ससोबत (Tribeca Developers) करार केला आहे. या बाबत माहिती देताना ट्रायबेका डेव्हलपर्सचे संस्थापक कल्पेश मेहता यांनी सांगितले की, त्यांच्या कंपनीने ट्रम्प ऑर्गनायझेशनशी भागीदारी केली आहे. ट्रम्प यांची कंपनी देशाच्या विविध भागांतील प्रकल्पांवर काम करण्यासाठी एकूण 2,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. कल्पेश मेहता यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा डोनाल्ड ट्रम्प जूनियर (Donald Trump Jr. ) यांच्या उपस्थितीत या सर्व गोष्टी सांगितल्या होत्या.
पाच हजार कोटींच्या गुंतवणुकीची योजना
ट्रायबेका डेव्हलपर्सचे संस्थापक कल्पेश मेहता यांनी सांगितले की, ट्रम्प यांची कंपनी आणि ट्रायबेका डेव्हलपर्सची भारतात एकूण 5,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आहे. यासाठी दोन्ही कंपन्यांमध्ये 7 ते 8 प्रकल्पांसाठी भागीदारी केली जाणार आहे. यामध्ये दोन्ही कंपन्या 2,500-2,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करतील. लुधियाना आणि चंदीगडच्या प्रकल्पांसाठी ट्रम्प सतत चर्चा करत आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की ट्रम्प यांच्याकडे भारतात आधीपासूनच एकूण चार मालमत्ता आहेत, ज्याची किंमत अमेरिकेबाहेर सर्वाधिक आहे. ट्रम्प यांच्या कंपनीने मुंबईत ट्रम्प टॉवर तयार केलेला आहे.